Tue. Jan 18th, 2022

ट्विटरकडून चूक दुरुस्त! उपराष्ट्रपतींच्या अकाऊंटला पुन्हा ‘ब्लू टिक’

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्लू टिक’ ट्विटरकडून हटवण्यात आली होती. मात्र, याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर ट्विटरकडून ब्लू टिक पुन्हा देण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यालाही ब्लू टिक देण्यात आलेला आहे. मात्र, हा ब्लू टिक ट्विटरकडून हटवण्यात आला असल्याचं शनिवारी निदर्शनास आलं. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्याने सरकार, तसेच भाजपकडून नाराजी व्यक्त केली होती. सरकारच्या नाराजीनंतर ट्विटरने आपली चूक मान्य केली आणि उपराष्ट्रपतींच्या अकाउंटला पुन्हा ‘ब्लू टिक’ दिली आहे.

जर एखाद्या खात्याचं नाव बदललं गेलं असेल किंवा एखादं अकाउंट सक्रिय नसेल किंवा अपडेट होत नसेल, तर ते अनव्हेरिफाइड केलं जातं आणि ‘ब्लू टिक’ हटवली जाते. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या कृतीबद्दल ट्विटरकडे नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणी ट्विटरवर योग्य कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *