Thu. Dec 12th, 2019

ब्ल्यू व्हेल गेमच्या नादात आत्महत्येसाठी शाळेच्या इमारतीवरून मुलाचा उडी मारण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था, मध्य प्रदेश

 

तुमच्या मुलांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण ब्ल्यू व्हेल गेमच्या जाळ्यात मुलं चांगलीच अडकली आहेत. ब्लू व्हेलमुळे आणखी एकाचा बळी जाता जाता वाचला.

 

महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशातल्या एका मुलाला ब्ल्यू वेल गेमच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यात आलं. सातवीत शिकणारा मुलगा ब्ल्यू वेल गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी शाळेच्या इमारतीवर आत्महत्या करण्यासाठी गेला.

 

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून त्यानं उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मित्र आणि शिक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *