Tue. Oct 26th, 2021

फोनवर बोलताना ब्लूटूथ इयरफोनचा स्फोट

चार्जिंगला फोन लावला किंवा फोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्यानं दुर्घटना घडल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. आता चक्क फोन नाही तर ब्लूटूथ इयरफोनमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. एक तरुण कानात ब्लूटूथ इयरफोन लावून बोलत होता. त्याचवेळी, कानातील इयरफोनचा स्फोट झाला. मोठा आवाज आल्याने खळबळ उडाली. या घटनेत युवकाच्या दोन्ही कानांना जखम झाली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरच्या चौमू भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जखमी युवकाला तातडीने शहरातील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. राकेश नगर असे मृताचे नाव आहे. हॉस्पिटलचे डॉक्टर एल. एन रुंडला म्हणाले की, देशात इयरफोन स्फोटाची ही बहुधा पहिलीच घटना आहे. मात्र, युवकाचा मृत्यू बहुधा कार्डियाक अरेस्टमुळे झाला असावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *