Fri. Sep 30th, 2022

पाण्याच्या टाकीला चावी देताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू ,चार जखमी

नाना चौकातील पाण्याच्या टाकीला चावी देताना पाच कामगारांचा तोल जाऊन टाकीत पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे.यामध्ये टाकीत पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या कामगारांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वैद्यकीय सूत्रांनुसार या चारही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.या आधीही नाना चौकातील जुन्या पाण्याच्या टाकीला चावी देताना दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

नेमक काय घडलं?

ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील नाना चौकात पाच पाण्याच्या टाकीला चावी देण्याचे काम करत होते.

काम करत असताना पाचही कामरांचा तोल गेला आणि ते टाकीत पडले.

टाकीत पडताच मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले.

अग्निशामक दल घटनास्थळी  तात्काळ दाखलळ झाले. १२ वाजून ४० मिनिटांनी हे बचावकार्य सफल झाले.

उमेश पवार, शांताराम भाकटे, सुरेश पवार आणि बाळासाहेब भावरे या चार कामगारांना उपचारसाठी दाखल करण्यात आलं आहे.

यामध्ये राकेश निगम या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.