Mon. May 17th, 2021

#BmcBudget : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई मनपाकडून खूषखबर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूषखबर आहे. दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रथम 25 विद्यार्थ्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पालिकेतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याबाबतची तरतूद मुंबई महानगरपालिकेच्या 2020-21 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मंगळवारी महानगरपालिकेच्या मुख्यालयात अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी यासंदर्भात घोषणा करण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण अर्थसंकल्प सहआयुक्त सलील आशुतोष आणि शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सादर केला.

10 वी च्या परीक्षेत प्रथम 25 येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत, यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी 210.82 कोटीची अधिकची तरतूद केली आहे.

दरम्यान मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प 2020-21 या आर्थिक वर्षासाठी ₹33,441.02 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *