Sat. Apr 17th, 2021

तबलिगी मरकजच्या कार्यक्रमात गेलेल्यांना मुंबई मनपाचा इशारा

दिल्लीला तबलिगी जमात मरकजच्या कार्यक्रमात कोरोनाबाधितांची उपस्थितीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाला देशातील विविध राज्यातील लोक सहभागी झाले होते. त्यात मुंबई येथील जे कुणी हजर होते, त्यांनी स्वतःहून मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधावा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलंय.

जर कुणी स्वतःहून पुढे येऊन आपण तबलिगीत सामील झाल्याचं मान्य केलं नाही, तर अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिले आहेत. तबलिगी मरकजला उपस्थिती राहिलेल्या लोकांच्या संपर्कामुळे मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे या कोरोनाबाधितांवर वेळीच उफचार करून त्यांना क्वारंटईन करणं आवश्यक आहे. अन्यथा या लोकांमुळे इतरांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे तबलिगी मरकजला उपस्थित असणाऱ्यांनी प्रवासाची माहिती महापालिकेला पुरवणं बंधनकारक आहे. मात्र यात लपवाछपवी केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असं पालिकेने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *