Fri. Oct 7th, 2022

शिर्डी साई मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त

महा विकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती मुबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे. येत्या दोन महीन्यात नविन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश राज्य सरकारला आदेश देण्यात आले आहे तो पर्यंत त्रिसदस्यीय समीती कामकाज पाहणार आहे.

दरम्यान गेल्या चार ते पाच महिन्यापासून औरंगाबाद खंडपीठात याबाबत सुनावणी सुरु होती. आज औरंगाबाद कोर्टाने शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर हे मंडळ बरखास्त झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेशही औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. शिर्डी साईबाबा मंदिर संस्थान च्या विश्वस्त मंडळावर राज्यभरातून सभासद नेमण्यात येतात. १६ लोकांना या मंडळावर निवडण्यात येते.

मात्र, तेव्हापासूनच या विश्वस्त मंडळाला विरोध करण्यात येत होता. साई बाबा मंदिर संस्थानच्या जाहीरनाम्यानुसार हे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात यात होता. याच पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळ नेमल्यापासून येथील उत्तरामराव शेळके यांनी औरगांबाद खंडपीठात धाव घेत याबाबत याचिका दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार विश्वस्त मंडळ साईबाबा मंदिर संस्थानच्या नियमाच्या अधीन नसल्याने बरखास्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान याच पार्श्वभूमीवर गेल्या तीन चार महिन्यापासून याबाबतची केस औरंगाबाद खंडपीठात होती, आज याबाबत कोर्टाने निर्णय देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.

1 thought on “शिर्डी साई मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.