Thu. Jul 9th, 2020

भीषण! सांगली – ब्रम्हनाळमध्ये बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 14 जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसात सांगली कोल्हापूरमध्ये महापुराने थैमान घातले आहे. या दोन्ही जिल्ह्यात बचावकार्य सुरु आहे.या दरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे. सांगलीत बचावकार्यादरम्यान ब्रम्हनाळमध्ये बोट उलटून 14 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसात सांगली कोल्हापूरमध्ये महापुराने थैमान घातले आहे. या दोन्ही जिल्ह्यात बचावकार्य सुरु आहे.या दरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे. सांगलीत बचावकार्यादरम्यान ब्रम्हनाळमध्ये बोट उलटून 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 30 जणांचा या बोटीमध्ये समावेश होता. 9 जणांचा मृतदेह सापडले असून इतर लोकांचा शोध सुरू आहे.

भीषण दुर्घटना

सांगली, कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसात पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. अनेक लोक या पुराच्या पाण्यात अडकले आहे. त्यामुळे या अडकलेल्या लोकांना बोटींच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हालवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

बचावकार्य सुरू असतानाच सांगलीतील ब्रम्हनाळमध्ये बोट उलटून 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 30 जणांचा या बोटीमध्ये समावेश होता. 9 जणांचा मृतदेह सापडले असून इतर लोकांचा शोध सुरू आहे.

ब्रम्हनाळ मधील गावात पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीद्वारे 30 लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्याचे काम सुरू होते. यावेळा अचानकचं बोट उलटली. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, दोघा लहान मुलांचा समावेश असून इतरांचा शोध घेणं सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *