Sun. Jun 20th, 2021

अमेरिकेत प्रवासी विमान नदीत कोसळले

अमेरिकेत प्रवासी विमान नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फ्लोरिडामध्ये प्रवासी हा प्रकार घडला आहे. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. फ्लोरिडातील जॅक्सनविलेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

नेमकं काय घडलं?

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये प्रवासी विमान नदीत कोसळल्याची घटना घडली आहे.

फ्लोरिडातील जॅक्सनविलेमध्ये हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

या विमानात 133  प्रवासी आणि 7  क्रू कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत आहे.

विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचेही प्रशासनाकडून सांगितलं आहे.

जॅक्सनविले येथील विमानतळावर विमान उतरत असताना  सेंट जॉन्स नदीत कोसळले.

 

स्थानिक यंत्रणांकडून मदत आणि बचाव कार्य ताबोडतोब  सुरू करण्यात आले.

जॅक्सनविले शहराचे महापौर आणि नगरपाल यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली.

अपघातग्रस्त विमान मायामी एअर इंटरनॅशनलचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या कंपनीच्या ताफ्यात बोईंग 700-800  ही विमाने आहेत.

या अपघाताची माहिती मिळाली असून अधिक माहिती घेण्यात येत आहे.

कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *