Mon. Jan 17th, 2022

‘टेक्नॉलॉजी’शी आमिर खानचा 36 चा आकडा

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये आमिर आपला एक जुना किस्सा ऐकवतोय. हा व्हिडिओ पाहून आमिर टेक्नॉलॉजी पासून कसा चार पाऊलं दूर पळतो, हे तुम्हांला समजेल.

टेक्नॉलॉजीचें बॉलिवूड कलाकारांना तसं बरंच वेड असलेलं आपण पाहतो. पण आमिर खानला मात्र असे कोणतंच वेड नाही.

टेक्नॉलॉजीशी आमिर खानचं वावडं

हल्लीचं आमीर खान एका इव्हेंटमध्ये सामील झाला होता.

यावेळी आमीर खानने शाहरूख खानने दिलेल्या लॅपटॉपचा किस्सा ऐकवला.

आमीर म्हणतो की, “मी टेक्नॉलॉजी पासून जितका दूर पळतो, तितका शाहरूख जवळ जातो”.

शाहरूख खान आणि आमीर खान एका शो-साठी एकत्र होते.

तेव्हा नवीनच लाँच झालेला लॅपटॉप घेण्यासाठी शाहरूख ने आमीर जवळ हट्ट धरला होता.

“मला त्याची गरज नाही”, असे समजावूनही शाहरूख मात्र ऐकतच नव्हता.

“शेवटी,तू तुझ्यासाठी घेशील तोच माझ्यासाठीही घे”, असे आमीर शाहरूखला म्हटला.

पण पुढे 5 वर्षांमध्ये एकदाही आमीरने त्याला उघडलं नाही.

त्यानंतर आमीरच्या मॅनेजरने लॅपटॉप त्याच्याकडे मागताच लगेच त्याला देऊन टाकला.

पण त्या लॅपटॉपला गंज चढल्यामुळं तो ऑन झालाच नाही.

आमीर सांगतो की, “आजही कम्प्युटर व लॅपटॉपवर काही काम असेल तर मला मुलांची मदत घ्यावी लागते.

पण मी समोर आलो की, मशीन मला पाहून घाबरतं,स्वत:हून काम करणं थांबवतं”.

आमिरने हा किस्सा सांगितला, तेव्हा सर्वांनाच हसू आलं.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *