Sun. Sep 19th, 2021

सोशल मीडियावर आमिर खानच्या मुलीला केलं ट्रोल

आमिर खानची मुलगी इरा खान ही सोशल मीडियावर सक्रीय असते शिवाय इरा नेहमीच तिचे फोटो हे इन्टाग्रामवर शेअर करत असते. नुकताच इराने तिच्या इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला त्यानंतर तिला काही नेटकऱ्यांनी चांगलचं सुनावलं आहे. इरा घातलेल्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली असून एका युझरने लिहिलं ,’तुझ्या नावापुढे जे खान आहे ते काढून टाक…’ तर दुसऱ्यानी युझरने तिला निर्लज्ज असल्याचं म्हटले आहे. एकाने लिहिले, ‘रमझान सुरू असताना हे सगळे करण्याची गरज होती का…’ सध्या मुस्लीम धर्मियांचा रमझान महिना सुरू आहे. त्यामुळे अनेकांनी इराला ट्रोल केले आहे. इराने तिच्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती स्विमींग पूलच्या बाजूला एका खुर्चीमध्ये बसलेली दिसत आहे. या फोटोमधील इरा अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. तिचा हा अंदाज काही लोकांना आवडला तर काही लोकांना न आवडल्यानं त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केले आहे.

इरा तिच्या रिलेशनशिपवरून ही नेहमी चर्चेत असते कारण अनेक वेळा ती तिच्या प्रियकरासोबतचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. इरा मानसिक आरोग्याशी निगडीत मोकळेपणाने बोलत असते आणि याविषयावर ती जनजागृती करण्याचेही काम करते. इराला देखील काही काळांपूर्वी नैराश्याचा त्रास झाला होता. त्यातून ती आता पूर्णपणे बाहेर आली आहे. इराच्या अभिनयाची फारशी आवड नाही. तिला दिग्दर्शनाची आवडते आणि त्यामुळेच २०१९ मध्ये तिने दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. तिने युरिरिड्स मेडिया नावाच्या नाटकाचे दिग्दर्शनही केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *