Sun. Jun 7th, 2020

…म्हणून सोशल मीडियावर कलाकार म्हणतायत #Ekladkikodekhatoaisalaga   

सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेणे हा एक नवा ट्रेंडच रुजू होतोय. शाहरुखने ‘झीरो’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधी बउआ सिंह या त्याच्या सिनेमातील भूमिकेच्या नावाने ट्विटरवर अकाउंट सुरू केले होतं.

तर आता अनिल कपूरनंही हा नवा फंडा त्यांच्या आगामी सिनेमासाठी वापरला आहे.

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ #Ekladkikodekhatoaisalaga हा हॅशटॅग देऊन त्यांनी त्यांच्या लेडी लव्हसोबत फोटो शेअर केला आहे.

अनिल कपूरने सुनिता कपूरसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. व त्या खाली #Ekladkikodekhatoaisalaga हा हॅशटॅग देत त्याच्या आयुष्यात पत्नीचे महत्त्व काय आहे, ते सांगितले आहे.

तसेच वरुण धवन, अर्जून कपूर, राजकुमार राव, रितेश देशमुखला टॅग करत त्यांच्या आयुष्यातील ‘Special Women’सोबत फोटो पोस्ट करण्याचे Challenge दिले आहे.

तर राजकुमार आणि रितेश देशमुख यांनी हे Challenge स्वीकारत त्यांच्या लेडी लव्हसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या सिनेमाच्या माध्यमातून अनिल आणि सोनम कपूर पडद्यावरही बाप-लेकीच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *