वडिलांपाठोपाठ दीपिका पादुकोनलाही कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनलादेखील करोनाची लागण झाली आहे.

दीपिकाच्या वडिलांच्या आता दीपिकाची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. दीपिका पादुकोनचे वडील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोन तसेच दीपिकाची आई आणि बहिण या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना बंगळूरू इथल्या भगवान महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अभिनेत्री दीपिका पादुकोनने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘यु आर नॉट अलोन’ हा हॅशटॅग वापरला आहे

 

Exit mobile version