Tue. Oct 19th, 2021

Corona Virus ची जगात साथ, Bollywood ची त्यावरही सिनेमा करायला सुरूवात!

कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात आलं आहे. जगभरात या महामारीची दहशत पसरली आहे. सिनेमाहॉल बंद ठेवण्यात येत आहेत. शुटिंग्ज रद्द करावी लागत आहेत. मात्र अशाही परिस्थितीत ‘बॉलिवूड’वाले मात्र यातही सिनेमाची कथा शोधत आहेत. ‘इरोस’ फिल्म्सने तर ‘कोरोना प्यार है’ हे टायटल रजिस्टर्डदेखील करून घेतलं.

‘बाजीराव मस्तानी’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’, ‘बदलापूर’, ’बजरंगी भाईजान’ यांसारख्या सिनेमांची निर्मिती करणाऱ्या ‘इरॉस इंटरनॅशनल’ने ‘कोरोना प्यार है’ नाव सिनेमासाठी रजिस्टर केलं. COVID-19 वर रजिस्टर झालेली ही पहिली फिल्म आहे.

2000 साली हृतिक रोशनची ‘कहो ना प्यार है’ नावाची फिल्म आली होती. ही फिल्म प्रचंड हिट झाली होती. याच सिनेमाच्या नावाशी साधर्म्य असलेल्या ‘कोरोना प्यार है’ या सिनेमाचं नाव ठेवलं आहे. ‘सध्या सिनेमाच्या कथेवर काम सुरू असल्याचं प्रोड्युसर क्रिशिका लुल्ला यांनी स्पष्ट केलंय. सर्व काही ठीक झालं की या सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.

या सिनेमात नेमके कलाकार कोण असतील, याची अजून काही माहिती दिलेली नाही. तरी या सिनेमाच्या नावाचं एक पोस्टर व्हायरल होऊ लागलंय. त्यात हिरो आणि हिरोइन दिसत आहेत. मात्र दोघांच्या चेहऱ्यावर मास्क असल्याने ते कलाकार कोण आहेत, हे समजत नाही. ‘कोरोना प्यार है’प्रमाणेच ‘डेडली कोरोना’ या नावानेदेखील एक सिनेमाचं टायटल रजिस्टर झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *