Sat. May 25th, 2019

जान्हवी कपूरने ‘असा’ केला आपला Birthday साजरा!

16Shares

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची कन्या जान्हवी कपूर हिने आपला 22 वा वाढदिवस साजरा केला. गेल्याच वर्षी ‘धडक’ या सिनेमातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलं. सध्याही तिच्या हातात काही चांगले सिनेमे आहेत. मात्र असं असलं, तरी अद्यापही ती आईच्या अकाली मृत्यूच्या धक्क्यातून सावरली नाहीय. गेल्याच वर्षी जान्हवीच्या वाढदिवसाच्या 10 दिवसांपूर्वी श्रीदेवीचा दुबई येथील हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. जान्हवीसाठी हा मोठा धक्का होता.

आता जान्हवी आपला 22 वा वाढदिवस आपले वडील आणि आपली बहीण यांच्याबरोबर वाराणसीमध्ये सेलिब्रेट करतेय.

जान्हवीनं आपल्या सर्व चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर “तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आशिर्वादांसाठी मी तुमची आभारी आहे.” अशी पोस्टही टाकली.

 

 

View this post on Instagram

 

Thankful & grateful. For all your love and blessings. For every opportunity. For my family. For my country. Love you all!

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

विशेष म्हणजे जान्हवीने ज्या पद्धतीने आपला बर्थडे केक कापला आहे, त्याबद्दल सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. तिने चक्क तलवारीने केक कापला.

सोनम कपूरसारख्या तिच्या नात्यातल्या मंडळींबरोबरच सारा अली खाननेही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

लवकरच जान्हवी कारगिल गर्ल नावाच्या गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसेल.

तसेच ‘तख्त’  या मल्टिस्टारर चित्रपटातही ती सध्या काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *