Fri. Oct 7th, 2022

नागार्जुनचा ब्रह्मास्त्र प्रवास संपुष्टात आला…

ब्रह्मास्त्र या चित्रपटाचे शूटिंग संपुष्टात आला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नागार्जुनने ब्रम्हास्त्रचे शूटिंग संपल्याचा आणि रणबीर, आलिया यांच्यासोबत अद्भुत अनुभव आल्याचे लिहिलं आहे. आलियानेही चित्रपटात एकत्र काम करतानाच्या आश्चर्यकारक आठवणींसाठी नागार्जुनचे इन्स्टाग्रामवर आभार मानले आहे. शिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे त्यामुळे या चित्रपटाची वाट ही चाहत्यांना आहे. नागार्जुन सरांचे ब्रम्हास्त्रमधील शुटिंग पूर्ण झाले आहे. सुंदर आठवणींसाठी आभारी आहे सर… तुमच्यासोबत काम करण्याचे भाग्य लाभले. चित्रपटाचे शूटिंग आता लवकरच संपेल. मागे वळून पाहताना किती सुंदर प्रवास या सिनेमासाठी झाल्याचं जाणवते.”, असं आलियाने लिहिलं आहे.

या चित्रपटात अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय शाहरुख खानची या चित्रपटात खास भूमिका असणार आहे. या चित्रपटाची चर्चा ही बराच दिवसापासून सोशल मीडियावर सुरू होती आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन असून फॉक्स स्टार स्टुडियोजने एकत्रित केलेला ‘ब्रह्मास्त्र’ हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दक्षिण सुपरस्टार नागार्जुन अक्केनेनी याने अयान मुखर्जी दिग्दर्शित यांच्या आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ला प्रेक्षकांना किती पसंती मिळेल हा येणार काळचं सांगेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.