शपथविधीसाठी ‘या’ कलाकारांना निमंत्रण

लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेने एनडीएला मोठ्या प्रमाणात मतं देऊन निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना भेटून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांसब अनेक दिग्गज कलाकारही या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

कोण आहेत दिग्गज कलाकार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7 वाजता शपथ घेणार आहेत.

या शपथविधी सोहळ्यासाठी जवळपास 6 हजार लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे.

या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गज कलाकारही उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये बॉलिवूडचे कलाकारांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेणारे अक्षय कुमार.

तसेच पीएम नरेंद्र मोदी चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारा विवेक ओबेरॉय उपस्थित राहणार आहे.

त्याचबरोबर कंगना रनौत, कैलाश खेर, अनुपम खेर, जावेद अख्तर, राजू श्रीवास्तव हजेरी लावणार आहेत.

बोमन ईरानी, अनिल कपूर यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

दिल्लीत पार पडणाऱ्या कार्यक्रमात किंग खान शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान उपस्थित राहणार आहेत.

रणवीर सिंहलाही निमंत्रण देण्यात आले असून तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी परदेशात असल्यामुळे तो या सोहळ्याला उपस्थिती लावणार नाही.

Exit mobile version