Wed. Dec 8th, 2021

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण ‘फाइटर’ चित्रपट झळकणार

मुंबई : बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय स्टार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण हे पहिल्यांदाच ‘फाइटर’ चित्रपटात एकत्र काम करणार असून चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. हृतिक रोशनने यासंदर्भात फोटो शेअर केले आहे. या फोटोत दीपिका ही ‘फाइटर’ चित्रपटाच्या टीमसोबत झळकली. या फोटोमध्ये हृतिक रोशन ब्लॅक टी-शर्ट आणि कॅपमध्ये दिसत असून दीपिका लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हृतिकने फोटोला कॅप्शन दिलंय, ”ही गँग टेक ऑफ करण्यासाठी सज्ज आहे.” आतापर्यंत या फोटोला १७ लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तसेच या चित्रपटात आलिया भट्टसह अनेक सेलेब्रिटी झकणार आहे.

हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त ‘फाइटर’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. 2022 मध्ये हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिद्धार्थ आनंद चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हृतिक रोशन अखेरचा वॉर या चित्रपटात दिसला होता. ‘विक्रम वेधा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशनही दिसणार असल्याची बातमी आहे. त्याचबरोबर लवकरच दीपिका पादुकोण आगामी ’83’ आणि ‘पठाण’ या चित्रपटातही दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *