Mon. Jan 24th, 2022

‘या’ कारणामुळे बदलली ‘कलंक’ चित्रपटाची तारीख

कलंक या चित्रपटाची करण जोहरनं घोषणा केल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची  उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.

या चित्रपटात माधुरी दीक्षीत,संजय दत्त्, आलिया भट आणि वरूण धवन यांच्याशिवाय आदित्य रॉय कपूर, कियारा अडवाणी हे प्रमुख भूमिकेत दिसतील.

या चित्रपटाची स्टार कास्ट खूप दमदार असल्यानं या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा आहेत.

हा चित्रपट 19 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता पण आता या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.

का बदलली चित्रपटाची तारीख

‘कलंक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.एकाच आठवड्यात दोन सुट्ट्या असल्यामुळे या चित्रपटाच्या कमाईचा फायदा होईल की नाही,या विचाराने त्यांनी चित्रपटाची ताऱीख बदलली आहे.

या चित्रपटात आलिया भट सह माधुरी दीक्षीत, संजय दत्त्, वरूण धवन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.हा चित्रपट 19 एप्रिलला  नाही, तर 17 एप्रिलला प्रदर्शित होईल.

17 एप्रिलला महावीर जयंती असल्यानं सुट्टी असणार तसेच 19 एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी आहे.एकाच आठवड्यातील 2 सुट्ट्यांमुळे हा चित्रपट कितपत नफ्यात जाईल, हे सांगता येत नाही.

कलंक चित्रपटाच्या कथेची कल्पना  करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहर यांना 15 वर्षांपूर्वी सुचली होती.पण यासाठी कित्येक वर्ष मुहूर्त सापडत नव्हता.

या चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा भरघोस मिळत आहे.

चित्रपटातील काळ 40 च्या दशकातील असून सगळ्या व्यक्तिरेखा एका वेगळ्याच रंगभूषेत पाहायला मिळतील.करण जोहरने  कलंक चा फर्स्ट लूक पाहूनच चित्रपटामधील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *