जावेद अख्तर, शबाना आझमी देशद्रोही- कंगना राणौत

जम्मु काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. या हल्ल्यात CRPFच्या 40 हून अधिक जवानांना वीरमरण आलं. या घटनेचे पडसाद सर्व देशभर पडलेले पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडमध्ये आपल्या विविध वक्तव्यांनी स्फोट घडवणाऱ्या अभिनेत्री  कंगना राणौतने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारंना धारेवर धरलंय. आपला संताप व्यक्त करताना कंगनाने शबाना आझमी, जावेद अख्तर यांना चक्क ‘देशद्रोही’ म्हटलंय.

काय म्हणाली बॉलिवूडची ‘क्वीन’?

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आझमी देशद्रोही आहेत.

जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे पाकिस्तानशी सांस्कृतिक आदानप्रदान करत असतात.

‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांचं हे लोक समर्थन करतात.

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घातली आहे.

असं असताना शबाना आझमी आणि जावेद अख्तर हे पाकिस्तानात कार्यक्रमासाठी कशासाठी जात होते?

असा सवाल कंगनाने केला आहे.

तसंच, चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार देशद्रोही असल्याचा दावाही कंगनाने केला.

“सिद्धूसारख्या लोकांची गाढवावरून धिंड काढायला हवी”

कंगनाने नवज्योत सिंग सिद्धु यांना पण चांगलेच धारेवर धरले.

पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी हिंसा नव्हे तर संवाद हवा, असं सिद्धू यांनी वक्तव्य केलं.

त्यांचे नाव न घेता कंगनाने त्यांना टोमणा मारला.

जवानांवर हल्ला केला जात असताना काही लोक हिंसा, अहिंसा आणि शांतीच्या गोष्टी करत आहेत.

अशा लोकांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावर धिंड काढायला हवी,

पाकिस्तान हा फक्त आपल्या देशावरच नाही, तर आपल्या सहनशक्तीवरही वार करत आहे, असंही ती म्हटली.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी पाकिस्तानचं कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं.
पण तरीही कंगनाकडून त्यांच्यावरची टीका सुरूच आहे.

Exit mobile version