Sun. Aug 18th, 2019

बसंतीने वीरूंना ‘अशा’ दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

0Shares

धर्मेंद्र आज  (8 डिसेंबर) त्यांच्या 83वा वाढदिवस साजरा करत आहेत. याही वयात धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. लवकरच त्यांचा ‘यमला पगला दिवान 3’ सिनेमा येणार आहे. आजचा दिवस ड्रीम गर्लसाठी अत्यंत स्पेशल असून त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनी आणि बाॅलीवूड सुपरस्टार धर्मेंद्र हे सर्वात रोमॅंटिक कपल्स आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यामुळेच त्यांची रियल लाईफ प्रेमकथा ही एकदम फिल्मी आहे. हेमा मालिनी यांनी आपल्या ‘Hema Malini – Beyond The Dream Girl’ या बायोग्राफीत धर्मेंद्रसोबतचे नातं विस्तारीत रूपात मांडलं आहे.

1970 पासून 2011 पर्यंत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 33 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘शोले’, ‘जुगनू’, ‘चरस’, ‘प्रतिज्ञा’, ‘सीता और गीता’ असे हिट चित्रपट गाजवले आहेत.

या दोघांचा पहिला चित्रपट ‘तुम हसीन मैं जवां है’, 24 जुलै 1970ला प्रदर्शित झाला होता.

हेमा मालिनी यांनी ट्विटरवर धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच ‘धर्मेजींच्या वाढदिवसाबद्दल मला शुभेच्छा पाठविणाऱ्या सर्व असंख्य चाहत्यांचे आभार मानले आहेत’ आणि ‘मी तुमच्या शुभेच्छांबद्दल त्यांना निश्चितपणे सांगेन’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Hema Malini

@dreamgirlhema

Happy Birthday to my everlasting love, the dearest father to my darling girls & proud grandfather to Darien & Radhya.
I thank all the numerous fans who are sending their greetings to me on Dharamji’s birthday & I will definitely convey their wishes to him🙏

1,038 people are talking about this

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *