Wed. Jul 28th, 2021

#SushmaSwaraj यांच्या निधनावर ‘या’ Bollywood कलाकारांनी व्यक्त केला शोक

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री 10.50 ला निधन झालं. धडाडीच्या नेत्या आणि अमोघ वक्तृत्वाने संसद गाजवणाऱ्या स्वराज यांच्या निधनाने केवळ राजकीय वर्तुळावरच नव्हे, तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. सातत्याने देशहितासाठी कार्यमग्न राहणाऱ्या स्वराज यांच्या निधनावर बॉलिवूडमधूनही हळहळ व्यक्त करण्यात आलीय.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. 


 

महानायक अमिताभ बच्चन यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

गीतकार जावेद अख्तर, त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आजमी यांनीही सुषमा स्वराज यांच्याशी राजकीय मतभेद असूनही सुषमा स्वराज यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत Tweet वरून दुःख व्यक्त केलंय. सिनेसृष्टीला Industry ची मान्यता देणं, तसंच संगीतक्षेत्रासाठी त्यांनी घेतलेली भूमिका यांच्या स्मृती दोघांनी जागवल्या.

माहिती प्रसारण मंत्री असताना आपण त्यांच्या नवरत्नांपैकी 1 असल्याचा उल्लेख शबाना आजमी यांनी Tweet मध्ये केला.

अभिनेत्री परिणिती चोप्रा ही देखील दिवंगत सुषमा स्वराज यांच्याच अंबाला शहरातील असल्यामुळे आपल्या लहानशा शहराचं नाव कर्तृत्वाच्या बळावर मोठं करणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली.

अभिनेता रितेश देशमुख यानेही Twitter वरून शोक व्यक्त केलाय.

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यानेही सुषमा स्वराज यांच्या निधनावर Tweet केलंय.

देशभक्तीपर सिनेमांना पुन्हा एकदा ग्लॅमर मिळवून देणाऱ्या अक्षय कुमारनेदेखील सुषमा स्वराज यांच्या निधनावर Tweet करत दुःख व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *