Thu. Jun 17th, 2021

कतरिना कैफच्या घरी भेटायला गुपचूप पोहोचला विकी कौशल,व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या अफेअरच्या चर्चा बी टाऊनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. तसेच या दोघांचं नातं ऑफिशिअली मान्य झालं नसली तरीही सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक चर्चा होतात. सध्याला विक्की आणि कतरिना हे त्यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आले आहे. या व्हिडिओत विक्की कतरिनाच्या घरून निघत असताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच कतरिना आणि विक्की बॉलिवूडच्या काही पार्ट्यांमध्येही एकत्र दिसतात. ई-टाइम्सनं विकी कौशलचा हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत विकी कौशल सोमवारी दुपारी कतरिनाला भेटायला तिच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर काही तासांनी विकी कौशलची कार कतरिनाच्या आपार्टमेंटमधून निघत असताना कॅमेऱ्यात कैद झाली. विकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी कधीही त्यांचं नातं मान्य केलेलं नाही. किंबहूना हे दोघंही कोणत्याही मुलाखतीत आपल्या नात्याविषयी बोलणं टाळताना दिसतात. मात्र ‘कपिल शर्मा शो’ मध्ये सूर्यवंशीच्या प्रमोशन दरम्यान करण जोहरनं कतरिनाला विकीच्या नावानं चिडवलं होतं. ‘पाहा यांच्या घरी सर्व कौशल मंगल चाललंय’ असं त्यानं कतरिना उद्देशून म्हटलं होतं. त्यानंतर देखील कतरिना आणि विक्रीच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. कतरिना ही लवकरच ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर हे देखील दिसणार आहे. तसेच कतरिना ही अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. याशिवाय तिच्याकडे सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपटही आहे. विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचं गेलं तर तो सुजीत सरकारच्या ‘सरदार उधम सिंह’ आणि आदित्य धरच्या ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे सॅम मानेकशॉ यांचा बबायोपिकही तो झळकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *