Sun. Aug 7th, 2022

श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आठवा बॉम्बस्फोट

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची बातमी ताजी असतानाच पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे. देहिवेला भागात सातवा बॉम्बस्फोट झाल्यानंतर पुन्हा आठवा झाला. यामुळे श्रीलंका पूर्णपणे हादरली आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कोलंबोमध्ये सहा साखळी बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बॉम्बस्फोटात 207 जण ठार झाले असून 400 हून अधिक जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये हा बॉम्बस्फोट केल्याची माहिती समोर आली आहे. ईस्टरच्या दिवशी चर्च आणि हॉटेलमध्ये हा बॉम्बस्फोट केल्यामुळे ख्रिश्चन समाजाला लक्ष्य केल्याचे समजते आहे.

ब्रेकिंग लाईव्ह अपडेट –

श्रीलंकेत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

देहिवेला भागात सातवा स्फोट झाल्यानंतर आठवा बॉम्बस्फोट झाला.

त्यामुळे श्रीलंका सरकारने सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

देहिवेला भागात झालेल्या असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरात मोठा बॉम्बस्फोट झाला आहे.

ईस्टरच्यादिवशी कोलंबोच्या चर्च आणि हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट.

बॉम्बस्फोटात 207  जणांचा मृत्यू झाला असून 400 जण जखमी झाले आहेत.

3चर्च आणि 3 हॉटेलमध्ये सहा साखळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून आम्ही कोलंबोतील भारतीय दूतावासाशी संपर्कात असून आम्ही लक्ष्य ठेवून असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

 

तसेच श्रीलंका येथील भारतीयांसाठी भारतीय दूतावासाशी संपर्क क्रमांकही ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा निषेध आपल्या ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करत या बॉम्बस्फोटाचा निषेध केला आहे.

 

नेमका कुठे झाले बॉम्बस्फोट ?

सेंट अँथनी चर्च ( कोलंबो )

सेंट सेबॅस्टिअनस चर्च ( नेगंबो )

बट्टिलकलोबा चर्च

शांग्रीला हॉटेल

सिन्नमोन ग्रँड हॉटेल

किंग्सबरी हॉटेल

देहिवेला भागात

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.