Tue. Sep 28th, 2021

पनवेल – कळंबोली येथे सापडली बॉम्ब सदृश वस्तू

पुलवामा हल्ल्यानंतर मुंबईमध्येही हायअलर्ट देण्यात आला होता. सध्या सर्वत्र दहशतवादी हल्ले सुरूच आहेत.यातचं पनवेल- कळंबोली येथे बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली. याची पाहणी बॉम्ब स्कॉड करत आहेत. परंतु यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने खळबळ

पनवेल – कळंबोली येथे बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे.

सुधागड शाळेच्या शेजारी ही वस्तू सापडल्याची माहिती देण्यात आली आहे.

ही वस्तू सापडल्यानंतर लगेचं बॉम्ब स्कॉड घटनास्थळी दाखल झालं आहे.

यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला असून बॉम्ब स्कॉड वस्तूची पाहणी करत आहे.
टायमर बॉम्ब असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून पोलीस त्याचा शोध सुरू आहे.

मात्र अशा प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *