बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन २१ एप्रिल रोजी भारत भेटीवर येणार आहेत. पंतप्रधान म्हणून बोरिस जॉन्सन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. ते गुजरातमधून दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. येथे बोरिस जॉन्सन गुंतवणूक आणि व्यावसायिक संबंधांवर विविध उद्योगपतींना भेटतील.
यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या या भेटीला ब्रिटनच्या नव्या इंडो-पॅसिफिक धोरणाशीही जोडले जात आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय-ब्रिटिश नागरिकांपैकी निम्म्याहून अधिक गुजराती वंशाचे आहेत. त्यामुळे डायस्पोरा कनेक्ट म्हणूनही ते महत्त्वाचे मानले जात आहे.