Mon. Sep 20th, 2021

 कुर्ल्याच्या अस्वच्छ लिंबू सरबतनंतर आता बोरीवलीचा अस्वच्छ इडली वडा

पुन्हा एकदा रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका अस्वच्छ इडलीवाल्याचा विडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. कुर्ल्याच्या रेल्वे स्टेशनवरील अस्वच्छ लिंबू सरबताच्या व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत या सरबताचे स्टॉल बंद केले होते. बोरिवलीत देखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये या  इडली वड्यासाठी लागणार पाणी हे शौचालयाचं असल्याचं समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

बोरिवलीत स्थानकाबाहेर इडली वडा विकणाऱ्या फेरीवाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत हा इडली वाला इडली वड्याच्या चटणीत तसेच  ग्राहकांना पिण्यासाठी, हात धुण्यासाठी अस्वच्छ पाणी वापरतो.
हे  पाणी चक्क शेजारील रेल्वेस्थानाकातील शौचालयाचं पाणी वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे.
हा इडलीवाला गेल्या कित्येक दिवसांपासून रेल्वे स्थानकाबाहेर अवैद्य रित्या इडली विक्री करत आहे.
 दैनंदिन तो वापरासाठी पाणी शौचालयातला वापरत असून  एका ग्राहकाच्या ही बाब निदर्शनास आली.
यानंतर त्या ग्राहकांने याचा व्हिडीओ करून सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.
या प्रकरणात मनसेने सुद्धा उडी घेतली असून प्रशासनाने वेळेवर या फेरीवल्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केलीये.
बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या इडलीवाल्याला ताब्यात घेऊन कारवाही करून सोडून दिलंय .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *