Fri. Sep 30th, 2022

दोन्ही राजे केसरकरांकडे

संभाजीराजे, उदयनराजे यांच्यासोबत आज भेटीचा योग आला. नाहीतर मला सातारा, कोल्हापूरला जावे लागले असते. दोघांशी पर्यटनावर चर्चा झाल्याचे राज्याचे नवे कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. छत्रपती उदयनराजे भोसले हे आज पुण्यात आले होते. त्यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंना राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले. खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न उदयनराजेंना विचारण्यात आला. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष काढला, त्यामुळे प्रत्येकजण शिवसेना आपलीच आहे असं म्हणतोय. मग शिवसेना माझी आहे असं मी पण म्हणायचं का? असं उत्तर उदयनराजेंनी दिले आहे.

दीपक केसरकर आणि संभाजीराजे छत्रपती यांची आज पुण्यात भेट झाली त्यावेळी ते बोलत होते. नवनिर्वाचित मंत्री दीपक केसरकर यांना पर्यटन खातं मिळावं अशी इच्छा आहे. रायगडासोबतच महाराष्ट्र पर्यटन देशभरात  पोहचण्याची गरज आहे. त्यांच्या मार्फत महाराष्ट्र देशभरात पोहचेन अशी अपेक्षा संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

मग माझी शिवसेना म्हणू का?

जेव्हा लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्याना एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही ताकद वापरावी लागत नाही. आता जी एकत्र आलेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, असं दिसतंय, असेही ते यावेळी म्हणाले. शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? असा प्रश्न विचारला असता उदयनराजे यांनी संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का? असे त्यांनी उत्तर दिले.

शिवसेनेने शब्द पाळला नाही

तसेच उदयनराजे याांनी देखील समाजमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलले शिवसेनेने खासदारकी दिली नाही हा माझ्यासाठी इतिहास झाला आहे. शिवसेनेने शब्द पाळला नाही. माझी त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे. मात्र आता स्वराज्यच्या माध्यामातून अनेक सामाजिक कामं हाती घेतले आहेत. विस्तापित, गरजू, गरीबांना ताकद देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्वराज्यच्या माध्यमातून राजकीय पक्ष काढणं सोपं नाही. त्यासाठी अनेक गोष्टी लागतात. त्या सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र प्रश्न सुटले नाहीत तर नक्कीच पक्ष काढायचा विचार करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.