Mon. Dec 6th, 2021

सावधान ! लिफ्टमध्ये मुलीला मारहाणकरुन लुटले; व्हिडीओ व्हायरल

लिफ्टचा वापर करत असाल तर सावधान कारण सध्या एका लिफ्टचा सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एक युवक लिफ्टमध्ये मुलीची बॅग हिसकावून  तिला मारहाण करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची  माहिती अद्याप समोर आलेली नाही. या व्हिडीओमध्ये युवक मुलीला जबर मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

नेमकं काय घडलं ?

लिफ्टमध्ये आधी एक मुलगी शिरते त्यानंतर एक युवक आता जाताना दिसतो.

लिफ्टचा दरवाजा बंद होतो.

दरवाजा बंद झाल्यावर युवक त्या मुलीला मारहाण करण्यात सुरुवात करतो.

मुलीच्या जवळ असलेली बॅग हिसवण्याचा प्रयत्न करतो.

मुलगी बॅग सोडत नसल्यामुळे तिला बेदम मारहाण करतो.

या मारहाणीत मुलगी बॅग सोडते. तिच्या बॅगमधील काही पैसे काढतो आणि लिफ्ट थांबताच पलायन करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *