Sun. Jun 16th, 2019

‘मला दिसणाऱ्या सर्व मुलींना मी ठार करणार’, FB Postकर्त्याला अटक!

43Shares

वादग्रस्त Facebook Post मुळे अमेरिकेतील उथा येथील तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ‘मला दिसणाऱ्या सर्व मुलींना मी ठार करणार’ असे Post मध्ये त्याने लिहिलं होतं.

मला फक्त 1 girlfriend हवी होती. मला हजार मुली किंवा पैसे नको होते. मला फक्त प्रेम हवं होतं. पण कुणीही मला ते दिलं नाही. 27 वर्षांचा असून पण माझ्या आयुष्यात कधीच girlfriend नव्हती आणि मी अजूनही virgin आहे. म्हणूनच मी लवकरच सार्वजनिक ठिकाणी जाऊन समोर येणाऱ्या प्रत्येक मुलीला ठार करणार आहे. पुढचा mass shooter बनणार आहे. मला मरणाची भीती नाही.

अशा अर्थाची पोस्ट त्याने लिहिली होती.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये महिलांच्या हक्कांसाठी ‘महिला मोर्चा’ आयोजित केले होते. अशातच तरुणाच्या या Post मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Facebook Post संदर्भात

27 वर्षीय तरुणाचं नाव ख्रिस्तोफर क्लॅरी आहे.

क्लॅरी मूळचा डेव्हेर शहरातील आहे.

रागाच्या भरात त्याने Facebook Post केली.

त्याला GF नसल्याने स्वत:वरच तो रागवला होता.

याच रागात सर्व तरुणींना ठार करण्याचा त्याचा विचार होता.

या संदर्भात कोलेरॅडो पोलिसांनी प्रोव्हो पोलिसांशी साधला संपर्क.

यापूर्वी त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे का याचा तपास दोन्ही पोलीस खातं करत आहे. दहशतवाद पसरवण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आलंय.

ज्यादिवशी अमेरिकेत महिला मोर्चाचं आयोजन केलं होतं, त्याच दिवशी या तरुणाने Post केली. पोलिसांनी तातडीने त्याच्या घरी छापा टाकत अटक केलं. Post मध्ये मोर्चासंबंधीचा कोणताही उल्लेख नाही. मात्र महिलांच्या सुरक्षे करिता त्याला अटक.

43Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *