Thu. Oct 21st, 2021

ब्लू फिल्म दाखवत 9 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

डोंबिवलीमध्ये कोळे गावात 9 वर्षाच्या मुलावर 33 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चाळीत राहणाऱ्या कुटुंबाच्या शेजारी असलेल्या तरुणानेचं हे कृत्य केलं आहे. त्या मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. या प्रकरणी त्या मुलाला धमक्या देवून हा सगळा प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. दिनेश लाहोटी असे या तरुणाचे नाव असून याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कलम 315, 377 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिनेश लाहोटी हा डोंबिवलीमध्ये कोळे गावात एका चाळीत वास्तव्यास आहे.

तो त्याचं परिसरात हाऊसकीपिंगचं काम करतो

त्याच्याचं चाळीतील एका लहान मुलाला बोलावून घेवून तो त्याच्यावर तो अत्याचार करत होता.

त्या मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्यावरती अनैसर्गिक अत्याचार करत होता.

त्या मुलाला धमक्या देवून हा सगळा प्रकार करत असल्याचे समोर आले आहे.

पुन्हा पुन्हा तो त्या मुलाला बोलवत असल्याने त्या मुलाने आईवडीलांकडे तक्रार केली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दिनेश लाहोटी याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

कलम 315 /377 आणि बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *