Fri. May 7th, 2021

बॉयफ्रेंडनेच भटजी बनून लावलं ‘तिचं’ लग्न, आणि नंतर…

नवविवाहीत तरूणी आपलं लग्न लावणाऱ्या पंडितजीबरोबरच पळून गेल्याची घटना मध्य प्रदेशातील सिरोंज येथे घडली आहे. लग्नानंतर 15 दिवसांतच नवरी मुलगी या पंडितसोबत पळाली.

काय घडलं नेमकं?

‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या माहितीनुसार, सिरोंज येथे राहणाऱ्या 21 मुलीचं बासौद येथील एका तरुणाशी थाटामाटत विवाह झाला होता.

हा विवाह विनोद नामक पंडितानेच लावला होता.

विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी ही नवविवाहिता माहेरपणासाठी आली.

सिरोंज येथे 23 मे रोजी आणखी एक विवाह होणार होता.

या विवाहाचे विधीही विनोदच संपन्न करणार होता.

मात्र विवाहाच्या वेळी पंडितजी कुठे सापडेच ना…

विनोदची शोधाशोध करूनही कुणाला तो दिसलाच नाही.

त्यानंतर नवविवाहीत तरुणीही गायब झाल्याचंही लक्षात आलं.

मात्र दोघं एकत्र पळून गेले असतील, असा विचारही कुणाच्या मनात आला नाही.

जेव्हा पोलिसांत तक्रार दाखल केली गेली, तेव्हा चौकशीदरम्यान या गोष्टींचा खुलासा झाला.

विनोद आणि या नवविवाहितेचं गेल्या 2 वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू असल्याचा खुलासा झाला.

धक्कादायक खुलासा

विनोदबद्दल माहिती मिळताच पोलीस त्याच्या शोधार्थ त्याच्या गावी पोहोचले.

विनोदच्या घरी चौकशी केल्यावर मिळालेल्या माहितीने पोलिसांनाही धक्का बसला.

विनोदचं यापूर्वीच लग्न झाल्याचं त्याच्या कुटुंबियांकडून कळलं.

एवढंच नव्हे, विनोद याला 2 मुलंही असल्याचं त्यांनी सांगितलं.

विनोद आणि ही नवविवाहिता अद्याप बेपत्ताच आहेत. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत. तरुणीने पळून जाताना तब्बल दीड लाख रुपये किमतीचे दागिने आणि 30 हजार रुपये घेऊन पळून गेली आहे. पोलीस आता दोघांचा शोध घेत आहेत.

आपला विवाह झाला असतानाही दुसऱ्या मुलीशी प्रेम प्रकरण करणारा आणि एवढंच नव्हे, तर तिच्या दुसऱ्या व्यक्तीशी होत असलेल्या विवाहात पंडित बनून विधी संपन्न करवणाऱ्या आणि पुढच्या 15 दिवसांतच तिच्याबरोबर पळून जाणाऱ्या विनोदची आता सिरोंज येथे चांगलीच चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *