19 वर्षीय बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे तुकडे करून शिजवले ओव्हनमध्ये

गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड यांच्यात जसा रोमांस चालतो, तसा कधीकधी किरकोळ कारणांवरून वादही होतो. त्यानंतर ‘रूठना, मनाना’ सारख्या गोष्टी घडून दोघे पुन्हा एकत्रही येतात. मात्र एका 19 वर्षीय तरुणाने मात्र क्षुल्लक वादानंतर इतकं टोकाचं पाऊल उचललं, की वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
अर्जेंटिनामध्ये कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात मुलाकडून घडलेला विकृत गुन्हा समोर आला आहे.
5 वर्षांपूर्वी 19 वर्षांच्या नईमा वेरा या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला आपल्या अपार्टमेंटमध्ये आणलं. तिकडे त्यांचं गर्लफ्रेंडशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका पेटला, की रागाच्या भरात त्याने गर्लफ्रेंडला ढकलून दिलं. तिचा तोल जाऊन ती पायऱ्यांवरून घसरली. तरीही आरोपीने तिला एका चादरीत गुंडाळून तिचा गळा दाबला. जेव्हा गर्लफ्रेंड मेल्याचं त्याच्या लक्षात आलं, तेव्हा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने अत्यंत राक्षसी कृत्य केलं.
वेरा याने चक्क गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते ओव्हनमध्ये शिजवले.
मात्र एवढं होऊनही त्याच्याविरोधात पुरावे मिळाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र मृतदेहाचा सुगावा लागत नव्हता. अखेर 5 वर्षांनंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचं नेमकं काय केलं, हे समोर आलं आहे.