Thu. Sep 19th, 2019

प्रियकरानेच केले प्रेयसीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

0Shares

प्रेयसीच्या कुटुंबियांनी लग्नाला विरोध केल्यामुळे रागाच्या भरात प्रियकराने फेसबुकवर फेक अकाऊंट बनवून तरूणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नाशिक येथे घडली आहे. या घटनेची माहिती तरूणीला मिळताच त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र आरोपी फरार असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं ?

तरूण आणि तरूणीचे काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते.

याच प्रेमसंबंधातूनच दोघांनी लग्न करण्याच निर्णय घेतला.

आपलं एका तरूणावर प्रेम असल्याचे तरूणीने तिच्या घरी सांगितले.

मात्र तरूणाच्या घरची परिस्थिती ही फारशी चांगली नसल्याने तरूणीच्या कुटुंबियांनी नकार दिला.

त्यामुळे तरूणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला.

तरूणीचे दूसऱ्या मुलासोबत लग्न लावण्यासाठी दुसरे स्थळं बघण्यास सुरुवात केली होती.

या गोष्टीचा राग तरूणाने मनात ठेवला त्याने पीडित मुलीचे फेसबुकवर एक फेक अकाउंट तयार केले.

या फेक अकाउंटवर तरूणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले.

ही सर्व घटना तरूणीच्या लक्षात येताच तिने नाशिकच्या सायबर पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *