Sun. Sep 22nd, 2019

प्रेयसीसाठी प्रियकराने चोरले पर्शियन मांजर

0Shares
‘ तू म्हणत असशील तर चंद्र पण तुझ्या पायात आणून ठेवेन ‘ असे डॉयलॉग आपण ऐकलेच असतील. पण प्रेयसीसाठी एका प्रियकराने चक्क पर्शियन मांजर चोरल्याचा प्रकार मानकापूर येथे घडला आहे. अतिशय आकर्षक दिसणारी ही मांजर चोरीला गेल्याची तक्रार मिळताच सक्रिय झालेल्या मानकापूर पोलिसांनी या प्रेमीयुगुलाला शोधले. त्यांच्या ताब्यातून  ती मांजर ताब्यात घेतली आणि मूळ मालकाच्या ताब्यात दिली.मांजराची किंमत ३० हजार रुपये असल्याचे सांगितले जाते.

नेमकं प्रकरण काय?

मानकापुरात राहणारे डॉ. अंशुमन शाहिद यांना मांजरांचा खूप लळा आहे. त्यांच्याकडे तीन पर्शियन मांजर आहेत.
पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणाऱ्या या मांजरापैकी एक बेपत्ता झाले.
ते चोरून नेल्याचा अंदाज येताच डॉ. शाहिद यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली.
एरवी पशुपक्ष्यांच्या चोरी, बेपत्ता होण्याची पोलीस फारशी गांभीर्याने दखल घेत नाही आणि ते शोधून काढण्यात तत्परताही दाखवत नाही.
मात्र, नागपूर पोलिसांनी लगेच मांजराच्या शोधार्थ एक चमू कामी लावली. पोलिसांनी प्रारंभी डॉ. शाहिद यांच्या घराच्या आजूबाजूलाच चौकशी सुरू केली.
बाजूला राहणाऱ्या मुलीकडे एक आकर्षक मांजर असल्याचे पोलिसांना कळाले.
त्यामुळे पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. तिने तिचा हर्षल मानापुरे नामक प्रियकराने हे मांजर आणून दिल्याचे सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी हर्षलला ताब्यात घेऊन विचारपूस केली. प्रेयसीला हे मांजर खूप आवडायचे म्हणून ते चोरून तिला भेट दिल्याचे त्याने सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी हर्षल व त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *