Tue. May 17th, 2022

Girlfriend ला स्पर्श करता यावा, म्हणून त्याने काढलं हेल्मेट आणि…

दिल्ली येथे आत्तापर्यंत महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या, अत्याचारांच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र 11 जून रोजी बाईकवरून जात असलेल्या जोडप्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्यामुळे दिल्लीत खळबळ उडाली होती. बाइकवरून जाताना कुणावर असा हल्ला कसा केला गेला, याबद्दल पोलीसही संभ्रमित होते. मात्र आता या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

कुणी केला होता अॅसिड हल्ला?

11 जून रोजी एका तरुण जोडप्यावर बाईकवरून जात असताना अॅसिड हल्ला झाला होता.

पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जोडप्याची तपासणी केली.

त्यावेळी Girlfriend च्या हातावर अॅसिडचे शिंतोडे उडाल्यामुळे थोड्या जखमा झाल्या होत्या.

Boyfriendचा मात्र चेहरा, गळा आणि छाती अॅसिडमुळे जळाले होते.

पोलिसांनी यासंदर्भात दोघांचीही चौकशी केली.

आपल्या girlfriendने बाईकवरून जात असताना आपल्याला नीट स्पर्श करता येत नाही, असं  म्हणत boyfriendला त्याचं हेल्मेट काढायला सांगितलं होतं, असा जवाब Boyfriend ने दिला.

यामुळे पोलिसांना girlfriend वर संशय आला.

तिची कसून चौकशी केल्यावर girlfriendने आपला गुन्हा कबूल केला.

Girlfriend चे पीडित तरुणाशी 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

मात्र boyfriend लग्नासाठी तयार होत नव्हता.

एवढंच नव्हे, तर तर तो break up करण्याचा विचार करत होता.

त्यामुळेच girlfriend ने त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकून त्याचा चेहरा बिघडवण्याची भीषण योजना आखली.

बाइकवरून जात असतानाच आपल्याला boyfriend च्या चेहऱ्याला नीट स्पर्श करता येत नसल्याचं लाडिक कारण देत तिने boyfriend ला हेल्मेट काढायला सांगितलं.

आणि त्या मुलाने हेल्मेट काढल्यावर तिने त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं.

नेमकं कुणी केलं, हे त्यालाही तेव्हा समजलं नाही. मात्र पोलिसांच्या चौकशीत सर्व गोष्टी समोर आल्या. आता girlfriend ला पोलिसांनी अटक केली आहे. Boyfriend वर अजूनही उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.