Jaimaharashtra news

ब्राह्मणांना आरक्षणाची गरज नाही – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

प्रत्येक जातीला आरक्षण पाहिजे. राज्यातील प्रत्येक जाती जमातीकडून आरक्षणााची मागणी होत आहे.

फक्त ब्राह्मण समाजाला आरक्षण नको. कारण आम्ही स्वत:च्या क्षमतेवर पोट भरू शकतो, असे विधान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं आहे.

ते पुण्यात एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवार दूरदृष्टी असलेले नेते – गोखले

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादग्रस्त पुस्तकावरुन अनेक चर्चा पाहायला मिळत आहे. राज्यात जाणता राजा या उपाधीवरुन अनेक उलटसुलट चर्चा पाहायला मिळत आहेत.

या प्रकरणावर विक्रम गोखले यांनी वक्तव्य केलं आहे.

शरद पवार हे व्हिजन असलेले नेते आहेत. ते कधीही म्हणणार नाही की मला जाणता राजा म्हणा म्हणून, असेही विक्रम गोखले म्हणाले.

महाराज यांची तुलना मोदींशी करणे चुकीचे आहे.

अस पुस्तक काढणा-यांनी तोंडाला लगाम लावयला हवा. राजे हे राजेच आहेत. असंही गोखले म्हणाले.

सोनिया गांधींना सावकरक माहिती नाही- गोखले

ज्यांना सावरकर कळाले नाही, ज्यांना समाजात किंमत नाही, ज्यांना नेहमी ब्राह्मण आणि इतर जातीत सतत वाद पेटवून ठेवायचा असतो त्यांना सावरकर काय कळणार, असा सवाल ज्येष्ठ नेते विक्रम गोखले यांनी केला आहे.

सोनिया गांधी यांना सावरकर हे माहीत नाही त्यांनी त्यांच्यावर बोलू नये.

राहुल गांधी यांना अधिकार नाही. असेही विक्रम गोखले म्हणाले.

Exit mobile version