चिमुकल्याने पकडून दिलं 17 घरफोड्या करणाऱ्या चोराला

विरार मध्ये 20 ऑगस्ट रोजी एका 11 वर्षीय चिमुकल्याने मोठ्या धाडसाने एका चोराला पकडून दिलं होतं. या चोराकडून पोलिसांनी तपास करत 17 गुन्ह्यांची उकल केली आहे. या चोराकडून जवळपास 10 लाखाचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.
काय घडलं होतं?
विरार पश्चिमेला राहणाऱ्या तनिष महाडिक याने 20 ऑगस्ट रोजी मोठं धाडस दाखवलं होतं.
तनिष घरात एकटा असताना अचानक एक चोर सर्वेक्षणाच्या बहाण्याने घरात घुसला होता.
मोठ्या धाडसाने तनिषने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.
या धाडसाबद्दल पोलिसांनी तनिषचा गौरव केला होता.
पोलिसांनी तपास करत त्याच्याकडून 17 घरफोडीचे गुन्हे उघड केले.
आरोपी अब्दुल गफार मन्सूर शेख याच्याकडून 25 तोळे सोनं आणि 45 ग्राम चांदीचे दागिने हस्तगत केले.
या दागिन्यांची किमत जवळ पास 10 लाख रुपये असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी दिली.
आरोपी शेख हा दिवसा आणि रात्री सुद्धा घरफोडी करायचा. वेगवेगळी सोंगं घेऊन तो चोरीच्या गुन्हे करत असे.
विशेष म्हणजे एकटाच असून त्याने एकट्यानेच इतक्या चोऱ्या केल्या आहेत.
विरार पूर्व-पश्चिम परिसरात त्याने हे गुन्हे केले आहेत. मुळचा जालना येथे राहणारा अब्द्दुल गफार मन्सूर शेख वेगळे नाव धारण करून नालासोपारा येथे राहत होता.