Mon. May 23rd, 2022

भारत बायोटेक उत्पादित कोव्हॅक्सिन लस खरेदीचा करार रद्द

ब्राझील सरकारने भारत बायोटेक या कोव्हॅक्सिन उत्पादक कंपनीशी केलेला लस खरेदीचा करार वादात सापडला आहे. ब्राझीलमधील व्हिसलब्लोअरनी या कराराबद्दल आरोग्य मंत्रालयातील अधिकारी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेइर बोल्सोनारो यांच्यावर गंभीर आरोप केले. हा मुद्दा ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर सरकारने लस खरेदी करार स्थगित केला. या वृत्तानंतर भारत बायोटेकने करार आणि लसीच्या किंमतीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ब्राझील सरकारने कराराला स्थगिती दिल्यानंतर भारत बायोटेकने होत असलेल्या आरोपांबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत बायोटेकने निवेदन प्रसिद्ध केलं असून, त्यात कराराची प्रक्रिया आणि लसीच्या किंमतीबद्दलही खुलासा करण्यात आला आहे. “ब्राझीलकडून खरेदी करण्यात येणारा कोव्हॅक्सिन लस करार टप्प्याटप्याने करण्यात आला. कराराची ही प्रक्रिया आठ महिने चालली. कोव्हॅक्सिनला ४ जून २०२१ रोजी आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली. त्यानंतर २९ जूनपर्यंत ब्राझीलला लसींचा पुरवठा करण्यात आलेला नाही, त्याचबरोबर ब्राझीलकडूनही रक्कम मिळालेली नाही,” असं भारत बायोटेकने म्हटलं आहे.

ब्राझील सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेला कोवॅक्सिन लस खरेदी करार रद्द केला आहे. ब्राझीलमध्ये या करारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यानंतर सरकारने ३२ कोटी डॉलरचा करार रद्द केला आहे. ब्राझीलमध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या करारावरून मोठा गदारोळ सुरू होता. त्यानंतर ब्राझीलने भारत बायोटेक कंपनीसोबत केलेला कोरोना लशीचा करार रद्द केल्याची घोषणा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.