Wednesday, March 19, 2025 02:10:45 PM

बजेट 2025 चा बाजारावर काय परिणाम होणार ?

बजेटच्या विस्तारानंतर औषधे आणि कच्च्या मालावरील करसवलतीमुळे आरोग्यसेवा आणि उत्पादन क्षेत्राचा खर्च कमी होईल.

बजेट 2025 चा बाजारावर काय परिणाम होणार

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. या  सरकारने प्रस्तावित केलेले बदल अनेक क्षेत्रांवर मोठा प्रभाव टाकणार आहेत. बजेटच्या विस्तारानंतर औषधे आणि कच्च्या मालावरील करसवलतीमुळे आरोग्यसेवा आणि उत्पादन क्षेत्राचा खर्च कमी होईल. विशेषतः जहाजबांधणी आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला याचा फायदा होईल, कारण उत्पादन खर्च घटल्यामुळे या क्षेत्रातील वस्तू स्वस्त होणार आहेत. 

त्याचबरोबर, सरकारने हस्तकला उद्योगाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. यामुळे पारंपरिक भारतीय उद्योगांना मदत होईल आणि लहान उद्योजक, कारागिरांना जागतिक बाजारपेठेत संधी मिळेल.

हेही वाचा: Union Budget 2025: अर्थसंकल्पातून पगारदारांना दिलासा

मात्र, काही तांत्रिक उत्पादनांवर, विशेषतः इंटरॅक्टिव्ह फ्लॅट-पॅनेल डिस्प्ले Interactive flat-panel display (जसे की मोठे टचस्क्रीन मॉनिटर्स) यांच्यावर सीमाशुल्क वाढविण्यात आले आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील काही वस्तू महाग होतील. याचा परिणाम कंपन्यांवर आणि सामान्य ग्राहकांवर होऊ शकतो, विशेषतः डिजिटल शिक्षण आणि कार्यालयीन उपकरणे यांना अधिक खर्च करावा लागू शकतो.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा

2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील हे बदल संमिश्र स्वरूपाचे आहेत. काही क्षेत्रांना फायदा होईल, तर काहींना नवीन अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. औषधे आणि उत्पादन क्षेत्राला दिलेल्या सवलती अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहेत, तर काही वस्तूंवरील वाढीव करांचा परिणाम बाजारावर दिसून येईल. 
 


Aadhaar Card-Voter ID Linking
Aadhaar Card-Voter ID Linking: आता आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक करण्यात येणार; बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

आता देशातील नागरिकांना त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे.

Jai Maharashtra News

aadhaar card-voter id linking आता आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक करण्यात येणार बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Aadhaar Card-Voter ID Linking
Edited Image

Aadhaar Card-Voter ID Linking: बनावट मतदान आणि बनावट मतदार ओळखपत्रांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशातील नागरिकांना त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करावे लागेल. प्राप्त माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी आज निर्वाचन सदन येथे केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ विभागाचे सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि यूआयडीएआयचे सीईओ आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक घेतली. 

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार - 

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचे काम संविधानाच्या कलम 326 मधील तरतुदींनुसार केले जाईल, असा निर्णय या बैठकीत  घेण्यात आला. लवकरच निवडणूक आयोग आणि UIDAI चे तज्ञ आधार-मतदार कार्ड लिंकेजवर तांत्रिक सल्लामसलत सुरू करतील. यानंतर लिंकिंग प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

हेही वाचा - Ladki Bahin Yojana Update: 'या' महिलांना एक रुपयाही नाही मिळणार; मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत होत आहे 'हा' मोठा बदल 

निवडणूक आयोगाने जारी केले निवेदन - 

दरम्यान, निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, संविधानाच्या कलम 326 नुसार, मतदानाचा अधिकार फक्त भारताच्या नागरिकालाच दिला जाऊ शकतो, परंतु आधार केवळ व्यक्तीची ओळख स्थापित करतो. म्हणून, असा निर्णय घेण्यात आला की मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) आधारशी जोडणे हे संविधानाच्या कलम 326 लोकप्रतिनिधी कायदा, 1950 च्या कलम 23 (4), 23 (5) आणि 23 (6) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तरतुदींनुसारच केले जाईल. आयोगाने म्हटले आहे की कायदा मतदार यादी स्वेच्छेने आधार डेटाबेसशी जोडण्याची परवानगी देतो.

हेही वाचा - 8th Pay Commission: जानेवारी 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल का? अहवाल सादर करण्यासाठी किती वेळ लागेल? जाणून घ्या?

बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार ओळखपत्र बनवल्याप्रकरणी 2 जणांना अटक - 

काही महिन्यापूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार ओळखपत्र बनवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दिल्लीत दोघांना अटक केली होती. निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तक्रारीच्या चौकशीदरम्यान, दोघांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता निवडणूक आयोगाने आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे.