Saturday, March 22, 2025 06:37:55 PM

IED Blast In Bijapur-Dantewada Border: बिजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात आयईडी स्फोट; 3 जवान जखमी

या घटना बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात घडल्या, जिथे सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाई करत होते.

ied blast in bijapur-dantewada border बिजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात आयईडी स्फोट 3 जवान जखमी
IED Blast In Bijapur-Dantewada Border
Edited Image

IED Blast In Bijapur-Dantewada Border: छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात झालेल्या आयईडी स्फोटात किमान तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना माओवादविरोधी कारवाईदरम्यान घडली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटना बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात घडल्या, जिथे सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाई करत होते.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान आणि जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) दोन कर्मचारी जखमी झाले. प्राथमिक अहवालानुसार, दोन जवानांनी चुकून प्रेशर-अ‍ॅक्टिव्हेटेड आयईडी स्फोट केला, ज्यामुळे स्फोट झाला, तर तिसऱ्या जवानाने नक्षलवाद्यांनी लावलेल्या स्पाइक ट्रॅपवर पाऊल ठेवले. 

दोन जवानांना रायपूरला हलवण्यात आलं -  

जखमी कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले. तसेच पुढील उपचारांसाठी रायपूरला विमानाने नेण्यात आले. आयईडी स्फोटात जखमी झालेल्या दोन जवानांना रायपूरमधील श्री नारायण रुग्णालयात आणण्यात आले. जखमी जवानांना अनेक जखमा झाल्या आहेत. डीआरजी कॉन्स्टेबल विजय कुमार (वय, 26) आणि सीआरपीएफ कॉन्स्टेबल प्रमोद कुमार (वय, 42) अशी जखमी जवानांची नावे आहेत. नक्षलवाद्यांच्या घटनेत जखमी झालेल्या आणखी एका जवानालाही चांगल्या वैद्यकीय मदतीसाठी रायपूर येथे आणण्यात आले आहे.

रायपूर येथील श्री नारायण रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील खेमका यांनी सांगितले की, 'दोन जवानांना येथे आणण्यात आले आहे. आणखी एका जवानाला लवकरच येथे दाखल करण्यात येईल. प्रमोद कुमारच्या पायाला दुखापत झाली आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करू. विजय कुमारला यांना किरकोळ दुखापत झाली आहे.'

विजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून 2 जणांची हत्या - 

छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी दोन जणांची हत्या केली. सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील एका गावात दोन जणांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तार्रेम पोलिस स्टेशन हद्दीतील बुगडीचेरू गावात घडली. अज्ञात नक्षलवाद्यांनी करम राजू (३२) आणि माधवी मुन्ना (२७) अशी ओळख असणाऱ्या दोन ग्रामस्थांची धारदार शस्त्राने हत्या केली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 
 


karnataka shutdown due to rising tension between kannada and marathi speakers
कन्नड -मराठी भाषिकांमधील वाढत्या तणावामुळे कर्नाटक बंद

कर्नाटकमध्ये कन्नड समर्थक संघटना म्हणजेच कन्नड ओक्कुटा यांनी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. कर्नाटकातील, कन्नड ओक्कुटा नावाच्या विविध कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी कर्नाटक बंदचे आयोजन केले होते.

Ishwari Kuge

कन्नड -मराठी भाषिकांमधील वाढत्या तणावामुळे कर्नाटक बंद

शनिवारी, 22 मार्च 2025 रोजी, कर्नाटकमध्ये कन्नड समर्थक संघटना म्हणजेच कन्नड ओक्कुटा यांनी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. ज्यामुळे, सकाळी  6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवासी, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांच्या वाहतूक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील, कन्नड ओक्कुटा नावाच्या विविध कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी कर्नाटक बंदचे आयोजन केले होते. बेळगावी येथे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) बस कंडक्टरने मराठीत न बोलल्यामुळे हल्ला करणाऱ्या मराठी समर्थक कार्यकर्त्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कन्नड समर्थक संघटनांनी केली आहे.


'या' आहेत आयोजकांच्या मागण्या:

 

मराठी गटांवर बंदी: कर्नाटकातील महाराष्ट्र एकीकरण समिती (MES) सारख्या मराठी गटांवर बंदी घालण्याची मागणी आयोजक करत आहेत.  

 

कन्नड भाषिक लोकसंख्येचे संरक्षण: आयोजक, कन्नड भाषिक लोकसंख्येच्या संरक्षणाची मागणी करत आहेत. खासकरून, जे बेळगावसारख्या सीमावर्ती भागांमध्ये राहत आहेत.

 

बेंगळुरू विभागाला विरोध: आयोजक, बंगळुरूच्या अनेक झोनमध्ये विभाजन करण्यासाठीही आयोजक विरोध करत आहेत. आयोजकांच्या मते, विभाजन केल्यास कन्नड संस्कृती कमकुवत होऊ शकते अशी भीती आयोजकांना वाटत आहे. 


'हे' आहेत कर्नाटक बंदची प्रमुख कारणे:

 

केएसआरटीसी (KSRTC) बस कंडक्टरवर झालेला हल्ला: बेळगावमध्ये कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बस कंडक्टरने मराठीत न बोलल्यामुळे मराठी समर्थकांनी हल्ला केला होता. याच्या निषेधार्थ, संपूर्ण राज्यभरात कर्नाटक बंद घोषित करण्यात आले. कंडक्टर मराठी भाषिक नसल्यामुळे झालेल्या हल्ल्यामुळे, राज्यात भाषिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला. 

 

सीमा वाद आणि भाषिक तणाव: या तणावांचे मुख्य कारण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वर्षानुवर्षे चालणारा सीमा वाद कारणीभूत आहे. 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती तेव्हा महाराष्ट्राने बेळगाव, कारवार आणि निप्पाणी यासारख्या गावांची मागणी केली होती. मात्र, कर्नाटकाने वारंवार नकार दिला. ज्यामुळे, हा सीमावाद थांबायचे नाव घेईना. 


बृहत्तर बेंगळुरू गव्हर्नन्स विधेयकाला विरोध: कर्नाटक बंद असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, बृहत्तर बेंगळुरू गव्हर्नन्स विधेयकाला विरोध. ज्यामध्ये, ज्यामध्ये बंगळुरूला अनेक प्रशासकीय झोनमध्ये विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. कन्नड समर्थक संघटनांना अशी चिंता आहे की, यामुळे कन्नड संस्कृती आणि शहरातील उपस्थिती कमकुवत होणार. 


कर्नाटक बंद दरम्यान, कोणत्या सेवा सुरु राहतील आणि बंद राहतील?

 

सार्वजनिक वाहतूक: बीएमटीसी आणि केएसआरटीसी बस सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर काही बस रस्त्यावरून जाऊ शकतात. बंदला पाठिंबा देण्यासाठी संघटनांनी हातमिळवणी केल्याने ओला आणि उबर यासारख्या खाजगी-टॅक्सी सेवा, ऑटो-रिक्षा, मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

शाळा आणि महाविद्यालये: खबरदारीचा उपाय म्हणून, खासकरून बेंगळुरूमध्ये, अनेक शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे. 

 

मॉल्स आणि थिएटर: निषेध वाढल्यास काही मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि मनोरंजन केंद्रे बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.