Saturday, March 14, 2026 10:57:30 AM

किन्नर आखाड्याने केली मोठी कारवाई; ममता कुलकर्णीला पदावरून हटवले, कारण काय?

ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्यानंतर किन्नर आखाड्यात भांडण सुरू झाली.

किन्नर आखाड्याने केली मोठी कारवाई ममता कुलकर्णीला पदावरून हटवले कारण काय

मुंबई : 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 25 वर्षांनी भारतात आली. तिने भारतात येताच महाकुंभात हजेरी लावली. महाकुंभात जाऊल तिने संन्यास घेतला आणि त्यानंतर महामंडलेश्वर बनली. ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्यानंतर किन्नर आखाड्यात भांडण सुरू झाली. अवघ्या ४ ते ५ दिवसात ममताला किन्नर आखाड्यातून काढण्यात आले. तिच्याकडून महामंडलेश्वर ही उपाधी काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. 


जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी 
उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. त्यानंतर तिला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवण्यात आले. मात्र आता तिची महामंडलेश्वर पादवरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यासोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्याकडूनही आचार्य महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आले आहे. दोघांनाही किन्नर आखाड्यातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

हेही वाचा : पुण्यात तीन दिवसीय विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात
 

अभिनेत्री ममता कुलकर्णी काही दिवसांपूर्वी भारतात परतली. भारतात आल्यावर तिने महाकुंभात हजेरी लावली. महाकुंभात तिने संन्यासाची दीक्षा घेतली. निवृत्त ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर करण्यात आले. मात्र याला कन्नर आखाड्यातील अनेक संतांनी विरोध केला. ममताला महामंडलेश्वर केल्याने किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावरही कारवाई होऊ शकते अशा चर्चा आहेत. 

हेही वाचा :  'भाजप ईव्हीएम सेट करते, महाराष्ट्र संकटात' संजय राऊतांची परखड टीका

अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आहे. त्यावर आता वाद वाढ असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीला महामंडलेश्वर बनवण्यावरून किन्नर आखाड्यात विरोध असल्याचे चित्र आहे. या मुद्द्यावरून किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास आणि आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी आमनेसामने आले आहेत. वारंवार होत असलेल्या चर्चांनुसार किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना मुक्त करण्याची तयारी सुरू केली आहे. 


auto driver mother
Auto Driver Mother : 21 व्या शतकातली हिरकणी! तीन वर्षाच्या लेकीला घेऊन ती माय चालवते रिक्षा, हृदयस्पर्शी व्हिडीओने तुमचेही डोळे पाणावतील

रोज सकाळी सकाळी साडेसहा वाजता एक आई आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन ऑटो रिक्षा चालवण्यासाठी घराबाहेर पडते. 

Shamal Sawant

auto driver mother  21 व्या शतकातली हिरकणी तीन वर्षाच्या लेकीला घेऊन ती माय चालवते रिक्षा हृदयस्पर्शी व्हिडीओने तुमचेही डोळे पाणावतील

आईची व्याख्या आपल्याला कधीही एका शब्दात करता येत नाही. पण अनेकदा आईला साथ देणाऱ्या मुलांचंदेखील कौतुकास्पद असतं. सध्या अशीच एक माय लेकीची जोडी सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.  परभणीची रहिवासी असलेल्या एका महिलेची, जी आज आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष करत आहे. रोज सकाळी सकाळी साडेसहा वाजता एक आई आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन ऑटो रिक्षा चालवण्यासाठी घराबाहेर पडते. 

indiaculturalhub च्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कोमल गायकवाड यांचा व्हिडीओ दिसत आहे. यामध्ये आलेल्या माहीतीनुसार,  2018 मध्ये लग्न झाल्यानंतर त्या पतीसोबत कल्याणमध्ये राहायला आल्या. येथे त्या गृहिणी म्हणून राहात होत्या, तर त्यांचे पती ऑटो रिक्षा चालवत होते. त्याच काळात त्यांच्या पतींनी त्यांनाही ऑटो चालवायला शिकवले. 2022 साली त्यांना तेजू नावाची मुलगी झाली. त्यानंतर त्यांचे पती बाहेर जातो असं सांगून घराबाहेर पडले ते कधी परतलेच नाहीत. आता मुलीला एकटं कसं सांभाळायचं असा प्रश्न पडला. मात्र त्यांनी हार मानली नाही. 

हेही वाचा - Maharashtra Freedom of Religion Act 2026 : आज मांडण्यात येणारं 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026' नेमकं काय आहे? जाणून घ्या 

घर चालवण्यासाठी त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यांना सिक्युरिटी गार्डची नोकरीही मिळाली. मात्र मुलीची काळजी घेण्यासाठी कोणीच नसल्याने ती नोकरी करणे कठीण होत होते. त्याचवेळी मोठा निर्णय घेत त्यानी रिक्षा चालवण्याचे ठरवले.त्यांनी एक ऑटो भाड्याने घेतली आणि मुलीला सोबत घेऊन काम सुरू केले.

हेही वाचा - India Receives Oil: मोदींच्या कूटनीतीला मोठं यश; इराणच्या विळख्यातून भारताचे तेलवाहू जहाज सुखरूप बाहेर, 'कारवार'मध्ये जहाजाचे आगमन 

सुरुवातीला त्यांनी ऑटोच्या मागे मुलीसाठी एक छोटा बिछाना तयार केला होता. पण प्रवासी बसल्यानंतर मुलगी घाबरून रडू लागायची. नंतर त्यांनी आपल्या शेजारीच मुलीसाठी एक छोटी सीट बसवून घेतली. एकदा एका प्रवाशाने या गोड मायलेकींचा एक व्हिडीओ शेअर केला आणि बघता बघता तो क्षणात व्हायरल झाला. "आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण द्यायचे. मी दहावीनंतर पुढे शिकू शकले नाही, पण माझ्या मुलीला मला मिळू न शकलेले शिक्षण नक्की देणार", असंही त्या म्हणाल्या. 


ताज्या बातम्या




ताज्या बातम्या