Monday, September 16, 2024 07:44:04 AM

MSRTC
एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ, संप मागे

राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय होताच एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले.

एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ संप मागे

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय होताच एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले. एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी तातडीने कामावर रुजू होतील, असे संघटनांकडून सांगण्यात आले.

मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ करत असल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले. 

राज्य परिवहनमध्ये सक्रीय असलेल्या ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे एसटीच्या २५१ पैकी बहुसंख्य आगारांमध्ये कामकाज बंद होते. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पगारवाढीची मागणी मान्य होताच संप मागे घेण्यात आला. पगारवाढीसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी सलग दोन दिवस झालेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला.

अशी झाली आहे पगारवाढ

सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट साडेसहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. ज्यांच्या पगारामध्ये २०२१ मध्ये पाच हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे. ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे. ज्यांना २०२१ मध्ये अडीच हजारांची वाढ मिळाली होती, त्यांच्या पगारात चार हजारांची वाढ झाली आहे. 

              

Chhagan Bhujbal
भुजबळ बोलले, जरांगे संतापले

अंतरवलीमधील दगडफेकीमागे आमदार रोहित पवार आणि आमदार राजेश टोपे हे होते. लाठीमारावेळी मनोज जरांगे हजर नव्हते. पण रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगेंना आणून बसवलं, असे भुजबळ म्हणाले

ROHAN JUVEKAR

भुजबळ बोलले जरांगे संतापले

नाशिक : अंतरवलीमधील दगडफेकीमागे आमदार रोहित पवार आणि आमदार राजेश टोपे हे होते. लाठीमारावेळी मनोज जरांगे हजर नव्हते. पण रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगेंना आणून बसवलं. मराठा आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी लाठीमार केला. उद्धव आणि पवारांना ही वस्तुस्थिती माहिती नव्हती; असे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ म्हणाले. भुजबळांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगेंनी संतापून प्रतिक्रिया दिली. म्हातारपणात पापाचा डाग लावून घेऊ नको, असे जरांगे म्हणाले. पोलिसांनी लाठीमार केला त्यावेळी पळालो असल्यास चौकशी करावी, असेही जरांगे म्हणाले. जरांगेंच्यानंतर रोहित पवारांचीही प्रतिक्रिया आली. रोहित पवारांनी भुजबळांचे आरोप फेटाळले. चौकशी करा आणि आरोप सिद्ध करा, असे आव्हान रोहित पवारांनी भुजबळांना दिले.