Sunday, November 09, 2025 06:15:58 PM

सैफवरील हल्ल्याच्या प्रकरणात एक जण ताब्यात

सैफ अली खानवर हल्ला, पोलिसांनी एक व्यक्ती ताब्यात घेतली<br/>सैफच्या घरातून तलवार ताब्यात घेतली, ब्लेडचा तुकडा पुरावा म्हणून<br/>वांद्रे पश्चिमेतील चोराची शिरजोरी, पोलिसांकडून नोंद न घेता चोराची धमकी<br/>

सैफवरील हल्ल्याच्या प्रकरणात एक जण ताब्यात

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी एक व्यक्ती ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तपास वेगाने सुरू असून, सैफच्या घरातून एक वडिलोपार्जित तलवार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सैफच्या शरीरावर असलेल्या जखमेतील ब्लेडचा तुकडा देखील पोलिसांनी पुरावा म्हणून ताब्यात घेतला आहे. सैफ आणि त्याची पत्नी करीना कपूर यांचा जबाब आजच नोंदवला जाण्याची शक्यता आहे.

16 जानेवारी रोजी सैफ अली खान यांच्या घरावर हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी सैफच्या घरात घुसून त्यावर शारीरिक हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफच्या पाठीत गंभीर जखमा झाल्या होत्या, ज्यात एक ब्लेडचा तुकडा डॉक्टरांनी काढला होता. पोलिसांनी हा तुकडा पुरावा म्हणून ताब्यात घेतला आहे.

तलवार ताब्यात घेतली : सैफच्या घरातून एक जुनी वडिलोपार्जित तलवार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी या तलवारीच्या बाबतीत अधिक तपास सुरू केला आहे. या तलवारीचा संबंध हल्ल्याशी असू शकतो, असे पोलिसांचे मत आहे.

चोराच्या घुसखोरीचे प्रकरण : वांद्रे पश्चिमेतील एक इमारत देखील चोरांनी लक्ष केलं. चोराने इमारतीतील गार्ड आणि मालकाला धमकावले आणि नंतर पोलिसांना फोन केल्यावर अर्ध्या तासात पोलीस आले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंदवला नसल्याची तक्रार इमारती मालकाने केली आहे. चोराला सोडून दिल्यानंतर तो परत येऊन इमारतीतील सिसिटीव्ही कॅमेरे तोडून गेला.

👉👉 हे देखील वाचा : सैफ अली खानच्या संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट आली समोर

सैफ अली खानच्या हल्ल्याचा तपास : सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासाला पोलिसांनी वेग दिला आहे. आज सैफ आणि करीना कपूर यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. सैफच्या घरातील दोन कर्मचाऱ्यांचे देखील पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत.

सैफ अली खानवर हल्ला करणारा चोरटा वसई विरारच्या दिशेने पलायन झाला आहे. वांद्रे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोराची छायाचित्रे कैद झाली आहेत, ज्यांच्या साहाय्याने पोलिस त्याचा मागोवा घेत आहेत. पोलिसांचे पथक वसई विरारमध्ये तपास करत असून, गुन्हे शाखेचे सूत्र सांगतात की वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नाहीत. मध्यरात्री झालेल्या हल्ल्याची माहिती गुन्हे शाखेला पाच तासांनी मिळाली आणि सीसीटीव्ही फुटेज व डिव्हीआर पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत. पोलिस आणि गुन्हे शाखेतील श्रेयवादामुळे तपासावर फटका बसला आहे.
 

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 


 


Major school bus accident in Nandurbar
Nandurbar School Bus Accident: नंदुरबारमधील देवगोई घाटात भीषण बस अपघात; स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळली

या भीषण दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, इतर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळावर पोलीस व प्रशासनाचे पथक दाखल झाले आहे.

Jai Maharashtra News

nandurbar school bus accident नंदुरबारमधील देवगोई घाटात भीषण बस अपघात स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळली

Nandurbar School Bus Accident: नंदुरबार जिल्ह्यातील देवगोई घाट परिसरात रविवारी सकाळी भीषण अपघात घडला आहे. शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक स्कूल बस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, इतर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळावर पोलीस व प्रशासनाचे पथक दाखल झाले असून, स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले आहे. बचाव पथक जखमी विद्यार्थ्यांना दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे.

प्राप्त माहितीनुसार, सातपुडा पर्वताच्या दुर्गम भागातील विद्यार्थी दररोज नंदुरबार शहरातील शाळेत जाण्यासाठी या बसचा वापर करत असतात. सोमवारी शाळा सुरू होत असल्याने बस विद्यार्थ्यांना शाळेकडे घेऊन जात असताना हा अपघात झाला. देवगोई घाटात अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा - Matoshree Drone News: ‘ठाकरेंवर लक्ष ठेवलं जातंय? मातोश्रीभोवती ड्रोनच्या घिरट्या; पोलिसांचा खुलासा

दरम्यान, घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात येत आहे. प्रशासनाकडून घटनास्थळी क्रेन आणि वैद्यकीय पथक पाठवण्यात आले आहे. या अपघातामुळे सातपुडा परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा खराब रस्त्यांबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र सुधारणा न झाल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा - Pune To Abu Dhabi Flight: एअर इंडिया एक्सप्रेसची “Tales of India” मोहिम; दिल्ली - पुण्याहून अबूधाबीला थेट उड्डाणं

याशिवाय, या दुर्घटनेनंतर पालक आणि स्थानिक नागरिक शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तथापी, बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात आणि सुरक्षा उपाययोजना न पाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील या भीषण अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.