Mangal Budh Yuti 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीचे मानवी जीवनावर मोठे परिणाम होत असल्याचे मानले जाते. यंदा जुलै 2025 मध्ये अशीच एक महत्त्वाची ग्रहयुती होणार असून, तिचे परिणाम काही राशींवर आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. 28 जुलै 2025 रोजी मंगळ ग्रह संध्याकाळी 7.58 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याच वेळी बुध ग्रह देखील कन्या राशीत असल्याने मंगळ-बुध युती तयार होणार आहे. विशेष म्हणजे, ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही ग्रह एकमेकांचे शत्रू मानले जातात. त्यामुळे त्यांच्या युतीचा परिणाम काही राशींना मानसिक, आर्थिक आणि करिअरच्या पातळीवर जाणवू शकतो.
हेही वाचा:Unique Temples: भारतातील ही 5 अनोखी मंदिरे , जिथे दिलं जातं मांस, मासे आणि मद्य प्रसादात; जाणून घ्या
मिथुन रास- खर्च आणि वादविवाद वाढणार
मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या तणावाचा ठरू शकतो. अनावश्यक खर्च वाढेल, तर अचानक वादविवादांची शक्यता आहे. त्यामुळे व्यवहार करताना सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
तूळ रास- मानसिक तणाव व आरोग्याची काळजी
तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असून, मनोधैर्य टिकवणं महत्त्वाचं ठरणार आहे. छोट्या गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून शांत राहणं आवश्यक आहे.
हेही वाचा:SHRAVAN 2025: श्रावणात ‘ही’ फुले चुकूनही महादेवाला अर्पण करू नका, अन्यथा होईल प्रकोप
धनु रास- करिअरमध्ये आव्हाने आणि संघर्ष
धनु राशीसाठी ही युती करिअरच्या दृष्टिकोनातून तणावपूर्ण ठरू शकते. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणं आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं हेच सुरक्षित पर्याय ठरतील. मेहनतीनंतरही अपेक्षित यश मिळणार नाही, याची तयारी ठेवावी लागेल.
मकर रास- प्रवास आणि कामात अडचणी
मकर राशीच्या व्यक्तींनी लांबचा प्रवास टाळावा. कामाच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे धैर्याने आणि संयमाने काम करणं गरजेचं आहे.
मीन रास- नातेसंबंधांमध्ये तणाव
मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ वैवाहिक किंवा प्रेमसंबंधांच्या बाबतीत तणावाचा असू शकतो. पार्टनरशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक नुकसान किंवा मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे समजूतदारपणा आणि धीर राखणं आवश्यक आहे.
एकूणच, मंगळ-बुध युतीचा काळ हा या पाच राशींसाठी आव्हानात्मक असणार आहे. मात्र, योग्य निर्णय, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास या काळातही संकटांवर मात करता येऊ शकते.
(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)