Saturday, October 12, 2024 08:44:11 PM

Supriya Sule
'मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही'

राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही

पुणे : राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. याआधी राज्यात मविआची सत्ता आली आणि संधी मिळाली तर राशपकडून मुख्यमंत्री या पदासाठी सुप्रिया सुळेंचे नाव सुवले जाईल अशी चर्चा होती. पण मविआच्या जागावाटपाचे सूत्र जाहीर होण्याआधीच सुप्रिया सुळे यांनी राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे जाहीर केले.

काही दिवसांपूर्वी शिउबाठाचे उद्धव हे सातत्याने मविआतील काँग्रेस आणि राशपच्या नेत्यांकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी करत होते. तर काँग्रेस नेते निवडणूक मविआ म्हणून लढू आणि निकालानंतर नेता ठरवू असे सांगत होते. या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळेंनी राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यामुळे उद्धव यांची अप्रत्यक्षरित्या कोंडी झाली आहे. आता मविआतील घटक पक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 


Raj Thackeray
'वचपा काढण्याची वेळ'

या निवडणुकीत क्रांती करा. सर्वांना हात जोडून विनंती आहे की, निवडणुकीत बेसावध राहू नका; असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.

ROHAN JUVEKAR

वचपा काढण्याची वेळ

मुंबई : या निवडणुकीत क्रांती करा. सर्वांना हात जोडून विनंती आहे की, निवडणुकीत बेसावध राहू नका. शमीच्या झाडावरची शस्त्रं उतरवा ही क्रांतीची वेळ, वचपा काढण्याची वेळ आहे; असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. दसऱ्यानिमित्त केलेल्या पॉडकास्टमधून राज ठाकरेंनी मतदारांना आवाहन केले. समाजाची प्रगती व्हायला हवी. जातीपातीत अडकू नका. जे काम करतील अशा व्यक्तींना मतदान करा, असे आवाहन राज यांनी केले. 



jaimaharashtranews-logo