Monday, March 09, 2026 09:00:57 PM

सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केलेले आरोप खोटे ?

डॉ. महेंद्र लोढा यांनी फेटाळले सुरेश धस यांचे आरोप, धनंजय मुंडे यांनी कधीही अट घातली नाही.

सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केलेले आरोप खोटे

बीड : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप खोटे ठरले असून, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेंद्र लोढा यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांनी कधीही अनंत प्रतिष्ठानच्या रुग्णालयासाठी जमीन देण्याबाबत कोणतीही अट घातली नाही, उलट त्यांना मदत केली होती.

काही वर्षांपूर्वी, डॉ. महेंद्र लोढा आणि डॉ. राजेंद्र लोढा यांच्या अनंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृद्धाश्रम आणि एचआयव्ही रुग्णालय उभारण्यासाठी शिरसाळा येथे जमीन मिळवण्यात आली होती. त्या वेळी, तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पुढे जात होती. डॉ. महेंद्र लोढा यांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांनी त्यांना केवळ मदतच केली, तर काही अटी घालून ट्रस्टमध्ये समावेश करण्याची कोणतीही मागणी केली नाही.

सुरेश धस यांचे खोटे आरोप ?
मात्र, सुरेश धस यांनी बीड येथील एका मोर्चात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत सांगितले की, त्यांनी अनंत प्रतिष्ठानच्या ट्रस्टमध्ये प्रवेश करण्यासाठी अटी घातल्या होत्या. डॉ. महेंद्र लोढा यांनी या आरोपांना फेटाळून लावले आहे आणि पुढे काय म्हणाले, "सुरेश धस यांनी आमच्याशी चर्चा न करता आमच्या कुटुंबाच्या नावाचा वापर करून खोटे आरोप केले आहेत."

हे देखील वाचा : प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्यातील वाद चिघळणार 

खरंच धनंजय मुंडे यांनी मदत केली ?
डॉ. महेंद्र लोढा यांनी अधिक स्पष्ट सांगितले, धनंजय मुंडे यांच्याकडून मिळालेली मदत सामाजिक कार्यासाठी अत्यंत उपयोगी ठरली. त्याचप्रमाणे, मुंडे यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून निधी मिळवण्यासाठी देखील प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.

सुरेश धस यांची या पूर्वीची वक्तव्ये चुकीची ?
सुरेश धस यांचे आरोप केवळ यावरच थांबले नाहीत. त्यांनी यापूर्वी परळीतील व्यापारी अमोल डुबे यांच्या प्रकरणात देखील चुकीचे आरोप केले होते. त्याबाबत संपूर्ण कागदपत्रे बाहेर आली आणि त्यांचे आरोप खोटे ठरले. तसेच, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळेही सुरेश धस अडचणीत येण्याची आलेले आहे.

हे देखील वाचा : चंद्रकांत पाटलांचा सुरेश धस यांना घराचा आहेर ? काय आहे प्रकरण ?

सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आणि महायुतीतचं सध्या खडाजंगी सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. असे असतांना डॉ. महेंद्र लोढा यांनी सर्व प्रकाराच्या खोट्या आरोपांचा धडाक्यात विरोध केला आहे असून महाराष्ट्राच्या राजकारणात अजून नवनवीन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढतात की थांबतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


Americas eye on Iran oil wealth Plot to divide the country War warning from Tehran
Iran US Conflict 2026: इराणच्या तेल संपत्तीवर अमेरिकेचा डोळा! देशाचे तुकडे करण्याचा कट; तेहरानकडून युद्धाचा इशारा

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बागाई यांनी तेहरानमधील पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, अमेरिका आणि इस्रायलचा मुख्य उद्देश इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करून देशाला कमकुवत करणे हा आहे.

Jai Maharashtra News

iran us conflict 2026 इराणच्या तेल संपत्तीवर अमेरिकेचा डोळा देशाचे तुकडे करण्याचा कट तेहरानकडून युद्धाचा इशारा

Iran US Conflict 2026: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेला इराणचे विभाजन करून येथील अफाट तेल संसाधनांवर बेकायदेशीर ताबा मिळवायचा आहे, असा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बागाई यांनी तेहरानमधील पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, अमेरिका आणि इस्रायलचा मुख्य उद्देश इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करून देशाला कमकुवत करणे हा आहे.

ऊर्जा संसाधनांवर नियंत्रणाची व्यापक रणनीती
बागाई यांनी आरोप केला की, अमेरिकेची रणनीती केवळ इराणपुरती मर्यादित नसून, इराण आणि व्हेनेझुएलासह जागतिक ऊर्जा संसाधनांवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याची आहे. "जर त्यांना इराण आणि व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवण्यात यश आले, तर जगातील 31 टक्के तेल संसाधने त्यांच्या ताब्यात असतील," असे त्यांनी नमूद केले. अमेरिकेने इस्रायलच्या हितासाठी या युद्धात उडी घेतली असून, त्यांच्या या 'युद्धखोर' कारवायांपूर्वी इराणने राजनैतिक चर्चांचे अनेक प्रयत्न केले होते, मात्र ते अपयशी ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर तणाव शिगेला
हा वाद 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका मोठ्या लष्करी कारवाईनंतर अधिक चिघळला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात 86 वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात इस्लामिक रिपब्लिकचे अनेक वरिष्ठ नेतेही मारले गेले. या घटनेचा बदला घेण्यासाठी तेहरानने अनेक अरब देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर आणि इस्रायली मालमत्तांवर प्रतिहल्ले सुरू केले आहेत. यामुळे संपूर्ण पश्चिम आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

हेही वाचा - Middle- East Tension : इराण-इस्रायल युद्धाचा फिवर कमी! JNPA बंदरात अडकलेले कंटेनर्स लागले मार्गाला; निर्यातदारांना काहीसा दिलासा

नव्या नेतृत्वाची घोषणा; मोज्तबा खामेनी बनले तिसरे सर्वोच्च नेते
इराणमधील या अस्थिरतेच्या काळातच एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. रविवारी इराणच्या तज्ज्ञांच्या सभेने (Assembly of Experts) दिवंगत अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र, 56 वर्षीय धर्मगुरू मोज्तबा खामेनी यांची इराणचे तिसरे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती जाहीर केली. इराणच्या राजकीय इतिहासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जात आहे. नव्या नेतृत्वाखाली इराण आता अमेरिकेच्या 'विभाजन' करण्याच्या प्रयत्नांना आणि इस्रायलच्या हल्ल्यांना कसे प्रत्युत्तर देतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.