Saturday, February 07, 2026 01:33:01 PM

सावंतांच्या मुलाने एका ट्रीपसाठी दिले तब्बल 68 लाख

आधी अपहरण आणि नंतर नाट्यमय बँकॉकवारी . सावंतांच्या मुलाच्या परदेशवारीने खळबळ . एका ट्रीपसाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च

सावंतांच्या मुलाने एका ट्रीपसाठी  दिले तब्बल 68 लाख

राज्याच्या राजकारणात  माजी मंत्री तानाजी सावंत यांचे नाव सतत चर्चेत राहिलं आहे. त्यांची ही वादग्रस्त विधाने प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी माध्यमांनाच खडेबोल सुनावत त्यावर स्वतःच पडदा टाकण्याचे काम त्यांनी केलंय. आता तानाजी सांवत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची बातमी आली आणि पूर्ण प्रशासन 'कामाला' लागले. दुपारी घरातून कोणालाही न सांगता निघालेला सावंत यांचा ऋषिराज हा मुलगा खासगी विमानाने बँकॉकला निघाल्याचे समजल्यावर त्याच रात्री त्याला परत बोलावले गेले. यासंपूर्ण अपहरणनाट्यात अपहरण केल्याचं वा तसा कट असल्याचं अद्याप कुठेही समोर न आल्यानं सावंत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

हेही वाचा:  दुःखाचा डोंगर बाजूला सारून वैभवीने दिला बारावीचा पेपर

तानाजी सावंतांचीआधीची वादग्रस्त विधाने 

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती
त्या घटनेचं खापर त्यांनी खेकड्यांवर फोडलं होतं
खेकड्यांच्या पोखरण्यामुळे हे धरण फुटल्याचं लक्षात येतयं, असं त म्हणाले होते
आरोग्यमंत्री असताना रुग्णालयात औषधे कमी पडत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता 
हाफकीनकडून वेळेत औषधे मिळत नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले
त्यावर 'तुम्ही त्या "हाफकीन" या माणसाकडून औषधे घेता ते बंद करा!' असं सावंत म्हणाले
मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता
सत्तांतर होताच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असं ते विधान होतं
तानाजी सावंत यांच्या विधानानंतर त्यांनी प्रत्येकवेळी माफी मागितली आहे

सोमवारी सायंकाळी त्यांचा मुलगा ऋषिराज सावंत घरी न सांगता अचानक गायब झाला. तानाजी सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेत थेट पोलीस ठाणे गाठले आणि मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. मुलगा कोणालाही न सांगता कुठे गेलाय, याचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना करत त्यांनी अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली. 

सावंताच्या तक्रारीनंतर पोलिसांना तातडीने शोधमोहिम उघडली, दरम्यान कंट्रोल रूमला याबाबत एक दूरध्वनी आल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. सावंत यांचा मुलगा खासगी विमानाने बँकाँककडे जात होता. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र होते. त्याला त्यांच्या वाहनचालकानेच विमानतळावर सोडले, ते विमान पोलिसांनी रात्री उशिराने पुण्याला परत बोलावून ऋषिराज सावंत सुखरूप असल्याचे सांगितले.असं नंतर पोलिसांनीच सांगितले.

या संपूर्ण घटनेनंतर तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांने याबाबतचा खुलासा केलाय. त्यांच्या म्हणण्यांनुसार ऋषिराज त्याच्या व्यावसायिक कामांसाठी बँकॉकला जात होता. या खुलाशाने याप्रकरणीतील संशय दूर होण्याऐवजी अधिक गडद होतंय..

 गिरीराज सावंत याचा खुलासा
सोमवारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास लहान भावाचा मेसेज आला
तो दोन दिवसांसाठी बाहेर चालला आहे 
आठ-दहा दिवसांपूर्वी तो दुबईला गेला होता
सहा-सात दिवसांपूर्वीच तो आला 
आणि पुन्हा अचानक फोन बंद करून तो निघून गेला
तो खासगी विमानाने बँकॉकला निघाला होता 
त्याच्या बिझनेसबाबत त्याचे काही खासगी काम तिथे होते

हेही वाचा:  तुषार भोसलेंकडून भुजबळांचा खरपूस समाचार

तानाजी सांवत यांचा मुलगा सुखरूप परतला, ही समाधानाची बाब असली तरी त्याचे अचानक जाणे, त्याने कोणाला न सांगणे, बँकॉकला जाण्यासाठी तब्बल 68 कोटी रुपयांचे खासगी विमान आरक्षित करणे अशा अनेक घटनांबाबत  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे पुणे पोलीस आणि तानाजी सावंत यांना द्यावी लागणार आहेत. वरकरणी हा कौटुंबिक वाद असावा अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. 

मात्र, तानाजी सावंत यांनी आपले कोणतेही वाद नव्हते असं स्पष्ट केलंय. हे अपहरण होते की ते त्यांच्या मर्जीने जात होते?, त्यांचा मुलगा ज्या विमानाने बँकॉकला जात होता त्याचे आरक्षण कोणी केलं होतं?, त्याच्यासोबत असलेले दोन मित्र कोण होते?, बँकॉकला तिघे कशासाठी आणि किती दिवसांसाठी जात होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांनाच शोधावी लागणार आहेत. अपहरणाची बातमी ज्या वेगाने पसरली आणि पोलिसांनी तत्परता दाखवत ते विमान माघारी बोलावलं, त्याच तत्परतेनं या आणि यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे सांवत कुटुंबीय आणि पोलीस प्रशासन देणार आहेत का? प्रसासकीय यंत्रणांना 'कामाला' लावणाऱ्या तानाजी सावंत यांच्या मुलावर पुढे काय कारवाई होणार? असा एक सामान्य प्रश्न जनतेला पडला आहे. 


vilas-bhumre-voting-controversy-evm
Zilla Parishad Election 2026: लोकशाहीची थट्टा? आमदाराने लहान मुलाकडून दाबून घेतले EVM चे बटण; व्हिडीओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरे यांनी मतदानावेळी मुलाकडून ईव्हीएमचे बटण दाबल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Akshaykumar Bankar

zilla parishad election 2026 लोकशाहीची थट्टा आमदाराने लहान मुलाकडून दाबून घेतले evm चे बटण व्हिडीओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू असताना एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. पाचोड येथील मतदान केंद्रावर आमदार विलास भुमरे यांनी मतदान केंद्रात आपल्या लहान मुलाला सोबत नेल्याचा आणि त्याच्या बोटाला शाई लावून मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मतदान करताना ईव्हीएमचे (EVM) बटणही त्या मुलाकडून दाबण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे लोकशाही प्रक्रियेचा अपमान झाल्याची तीव्र प्रतिक्रिया काही ठिकाणी उमटत आहे.

संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया

या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार संदिपान भुमरे यांनी म्हटले की, “लहान मुलांना मतदान केंद्रावर नेण्यास परवानगी असते. मात्र, नेमके काय घडले याची मला माहिती नाही. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच यावर अधिकृत प्रतिक्रिया देईन.”

हेही वाचा: PM Kisan 22nd Installment : खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात 22 व्या हप्त्याचे पैसे येणार; यादीत नाव 'असं' चेक करा

राज्यात मतदान प्रक्रिया सुरू

दरम्यान, राज्यातील 12 जिल्ह्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या असून, काही भागांत कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाल्याचेही वृत्त आहे. तथापि, बहुतांश जिल्ह्यांत मतदान शांततेत पार पडत आहे.

सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान

मतदान प्रक्रिया सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दिवसभरातील एकूण मतदानाची टक्केवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार असून,9 फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीनंतर ग्रामीण सत्तेचे चित्र स्पष्ट होईल. 

हेही वाचा: Eknath Khadse : आताची मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; प्रकरण काय?