Wednesday, January 15, 2025 05:12:12 PM

Ashwini Bhide
प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडेंची नियुक्ती; मेट्रोतून थेट मंत्रालयात

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे.

प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडेंची नियुक्ती मेट्रोतून थेट मंत्रालयात

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अश्विनी भिडे आता थेट मेट्रोतून मंत्रालयात जाणार आहेत. मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना त्यांनी उत्तमरित्या जबाबदारी सांभाळली. त्यामुळे मंत्रालयात प्रधान सचिव म्हणून मिळालेली नवीन जबाबदारी त्या कशी पार पाडतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  

 

अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीचे पत्र समोर आले आहे. या पत्रात शासनाने त्यांची बदली केली असल्याचे माहिती समोर आले आहे. यासोबत मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव म्हणून ब्रिजेश सिंह काम पाहत होते. त्यांच्या जागी आपली नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आपण ब्रिजेश सिंह यांच्याकडून त्वरित पदभार स्विकारावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यासोबतच पुढील आदेश येईपर्यंत मेट्रोतील संचालक पदाचा कार्यभारही सांभाळावा असे आदेश भिडे यांना देण्यात आले आहेत.

याआधी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार हा ब्रिजेश सिंह पाहत होते. मात्र आता ब्रिजेश सिंह यांना पदापासून मुक्त करण्यात आले आहे. सिंह यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी यांना त्वरित पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


Kejriwal to file nomination
"केजरीवाल उमेदवारी अर्ज दाखल करणार"

दिल्ली निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल उमेदवारी अर्ज दाखल करणार 

Manoj Teli

quotकेजरीवाल उमेदवारी अर्ज दाखल करणारquot

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज बुधवारी सांगितले की, ते ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज आपले उमेदवारी (नामनिर्देशन) अर्ज दाखल करणार आहेत.

केजरीवाल यांनी X वर पोस्ट करत सांगितले, "आज मी माझे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. दिल्लीतील अनेक माता भगिनी मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या सोबत येणार आहेत. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मी वाल्मिकी मंदीर आणि हनुमान मंदीरात जाऊन प्रभुंचे आशीर्वाद घेणार आहे."

केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा जागेवर भाजपचे पर्वेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्याविरुद्ध निवडणुकीत उतरले आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारी रोजी होणार असून, मतमोजणी ८ फेब्रुवारीला केली जाईल.

निवडणुकीच्या तारखेला जवळ जात असताना, आप आणि भाजप दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील दीर्घकाळ चाललेले गुप्त युती उघड होईल, याला "जुगलबंदी" असे म्हटले.

दरम्यान भाजप नेत्याने X वर प्रतिक्रिया देताना म्हटले, "देशाबद्दल चिंता करा, पण आपले नवी दिल्लीचे स्थान जपण्याबद्दल विचार करा."

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

केजरीवाल यांनी X वर पोस्ट करत म्हटले, "मी राहुल गांधींबद्दल एक ओळ बोलली आणि भाजपकडून उत्तर येत आहे. पहा, भाजपला किती त्रास होतोय. कदाचित ही दिल्ली निवडणूक काँग्रेस आणि भाजप यांच्यातील 'जुगलबंदी' उघड करेल."

सत्ताधारी आम आदमी पार्टीने (आप) सर्व ७० विधानसभा जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने ५९ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.

नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख १७ जानेवारी आहे. नामनिर्देशनाची तपासणी १८ जानेवारीला केली जाईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २० जानेवारी आहे.

काँग्रेस, जी दिल्लीमध्ये १५ वर्षे सतत सत्तेत होती, मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. एकही जागा जिंकता आलेली नाही. याउलट, आपने २०२० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ७० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ आठ जागा मिळाल्या होत्या. 

👉👉 हे देखील वाचा : 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा साकारणार'