Monday, February 16, 2026 05:08:42 AM

Mahashivratri 2025 : यंदाची महाशिवरात्री कशी आहे खास? महाशिवरात्रीचे महत्त्व आणि उपवासाचे कारण

महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी उपवास करून शिवपूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता.

mahashivratri 2025  यंदाची महाशिवरात्री कशी आहे खास महाशिवरात्रीचे महत्त्व आणि उपवासाचे कारण

 महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी उपवास करून शिवपूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता, असे मानले जाते. संपूर्ण देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. यंदाची महाशिवरात्री 2025 विशेष मानली जात आहे.  कारण शास्त्रानुसार ही तिथी अत्यंत शुभ फलदायी मानली जाते. शिवभक्तांसाठी हा दिवस महत्त्वाचा असून, भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होण्यासाठी विविध पूजाअर्चा, रुद्राभिषेक आणि उपवास केले जातात.

महाशिवरात्रीचे महत्त्व: 
महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकर आणि देवी पार्वतीच्या विवाहाचा पवित्र दिवस. या दिवशी भगवान शिवाने कैलास पर्वतावर माता पार्वतीशी विवाह केला होता, अशी पौराणिक मान्यता आहे. तसेच, हा दिवस ‘शिव तत्व’ म्हणजेच सृष्टीच्या उत्पत्तीचे आणि संहाराचे प्रतीक मानला जातो. याशिवाय, या दिवशी भगवान शिवाने कालसर्प दोष नष्ट केला, अशीही श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला 'शिव तत्व' सर्वात सक्रिय असते, त्यामुळे या दिवशी उपवास, ध्यान आणि जप केल्याने विशेष फलप्राप्ती होते.

हेही वाचा: Shivsena vs BJP: शिवसेना भाजपात विलीन होणार?

यंदाची महाशिवरात्री का आहे खास ?
यंदा महाशिवरात्रीला विशेष शुभ संयोग आहे. ग्रहस्थितीनुसार या दिवशी शनि आणि गुरुची विशेष युती असल्याने भक्तांना अधिक फलदायी अनुभव मिळण्याची शक्यता आहे. तसेच, शास्त्रानुसार महाशिवरात्रीला बेलपत्र, दूध, गंगाजल आणि पंचामृत अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. देशभरातील प्रसिद्ध शिव मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्मआरती, वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात गंगा आरती आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात विशेष पूजा होणार आहे.

महाशिवरात्रीला उपवास का करतात?
उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नव्हे, तर शरीर आणि मन यांचे शुद्धीकरण करण्याची संधी. या दिवशी उपवास केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.संशोधनानुसार, उपवास केल्याने शरीरातील टॉक्सिन्स, चिडचिडेपणा कमी होतो आणि मन अधिक शांत राहते. याशिवाय, भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी भक्त रात्रभर जागरण, मंत्रजप आणि ध्यान करतात.

महाशिवरात्रीची पूजा: 
शिवाच्या शिवलिंगाला बिल्वची पाने, दूध, मध आणि जल अर्पण करावे.
मंत्रांचा जप करावा.
महाशिवरात्री गाणी गावा.
“ओम नमः शिवाय” चा उच्चार करणे शुभ मानले जाते. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


Team India entered the Super 8 with a resounding win defeating Pakistan for the 8th time in the T20 World Cup
IND vs PAK T20 World Cup 2026: पाकिस्तानचा धुव्वा उडवला, भारतीय गोलंदाजांची पॉवरफुल खेळी

टी-20 विश्वचषक 2026 मधील सर्वात मोठ्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी मात करत आर. प्रेमदासा स्टेडियमवर तिरंगा फडकवला आहे.

Jai Maharashtra News

ind vs pak t20 world cup 2026  पाकिस्तानचा धुव्वा उडवला भारतीय गोलंदाजांची पॉवरफुल खेळी

IND vs PAK T20 World Cup 2026:  टी-20 विश्वचषक 2026 मधील सर्वात मोठ्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी मात करत आर. प्रेमदासा स्टेडियमवर तिरंगा फडकवला आहे. भारताने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने अगदी कमी धावांमध्ये डाव आटोपला. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला आठव्यांदा हरवून टीम इंडियाने शानदार विजयासह सुपर-8 मध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 विकेट गमावून 175 धावा केल्या. टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 18 षटकांत फक्त 114 धावाच करता आल्या.

इशान किशनचे वादळी 77 आणि रिंकूचा फिनिशिंग टच
प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. मात्र, इशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची जबरदस्त खेळी केली. यामध्ये त्याने अनेक खणखणीत चौकार आणि षटकार लगावले. डावाच्या शेवटच्या षटकात रिंकू सिंग (4 चेंडूत 11) आणि शिवम दुबे यांनी शाहीन आफ्रिदीला 16 धावा कुटल्या, ज्यामुळे भारताने 175/7 ही पाकिस्तानविरुद्धची विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली.

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा: बुमराह-हार्दिकने कंबरडे मोडले
176 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अतिशय भीषण झाली. हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात साहिबजादा फरहानला शून्यावर बाद करत 'मेडन ओव्हर' टाकली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने सॅम अयुब आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांना माघारी धाडून पाकिस्तानची अवस्था 3 बाद 14 अशी केली. स्टार फलंदाज बाबर आझम देखील अक्षर पटेलच्या फिरकीवर 5 धावा करून बाद झाला. ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्यामुळे पाकिस्तानचा संघ कधीच सामन्यात पुनरागमन करू शकला नाही.

फिरकीची जादू: कुलदीप आणि तिलकची साथ
मध्यंतराच्या षटकांमध्ये कुलदीप यादवने आपल्या फिरकीवर मोहम्मद नवाजला बाद केले, तर तिलक वर्माने पहिल्याच चेंडूवर शादाब खानची विकेट घेत पाकिस्तानच्या आशा संपुष्टात आणल्या. वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनीही टिच्चून गोलंदाजी करत धावांवर अंकुश ठेवला. पाकिस्तानचे फलंदाज केवळ 105 धावांत तंबूत परतले आणि भारताने एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.